शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राईनपाडा घटनेची तृतीयपंथीयांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:33 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आले़ ओळखपत्रासह आलेल्या या तृतीयपंथीयांच्या चेहºयावर राईनपाडा घटनेची धास्ती शनिवारी प्रथमच पहावयास मिळाली़

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आले़ ओळखपत्रासह आलेल्या या तृतीयपंथीयांच्या चेहºयावर राईनपाडा घटनेची धास्ती शनिवारी प्रथमच पहावयास मिळाली़मुले पळविणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा राज्यभरात पसरल्यानंतर निष्पाप लोकांना मारहाण करण्याचे प्रकार परभणी जिल्ह्यासह राज्यभरात घडू लागले़ अनोळखी माणूस शहरात दाखल झाल्यानंतर त्याच्याकडे संशयाने बघितले जात आणि या संशयातूनच हजारो जमावांचा बळी पडण्याची वेळ भटकंती करणाºया समाजावर आली होती़ यातूनच धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे गोसावी समाजातील पाच जणांची जमावाने ठेचून हत्या केली होती़ या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता़ भटकंती करणाºया सर्वच समाजावर घटनेचे खोलवर परिणाम झाले असून, त्याचा अनुभव शनिवारी सेलू शहरामध्ये आला़शनिवारी सेलू शहराचा आठवडी बाजार भरतो़ या बाजारपेठेत तालुक्यातील गावांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात़ दिवसभर होणारी गर्दी लक्षात घेऊन जालना शहरातून तृतीयपंथी दर शनिवारी सेलू शहरात दाखल होतात़ बाजारपेठेत फिरुन हे तृतीय पंथी पैसे जमा करतात़ मागील अनेक वर्षांपासूनच त्यांचा हा नित्यनियम आहे़ तालुक्यातील इतर गावांमध्येही ते फिरतात़ १४ जुलै रोजी दुपारी हे तृतीयपंथी सेलू शहरात दाखल झाले़ बाजारपेठेत येत असताना एक गोष्ट प्रकर्षाने डोळ्यात भरत होती ती म्हणजे प्रत्येक तृतीय पंथीयाने गळ्यात ओळखपत्र अडविले होते़ या ओळखपत्रावर त्यांचे नाव, पत्ता असा मजकूर लिहिला होता़ प्रथमच ओळखपत्र घेऊन भटकंती करणारे तृतीयपंथी पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटले़ बाजारकरूंसाठी हा अश्चर्याचा विषय असला तरी या तृतीयपंथीयांमध्ये राईनपाडा घटनेची धास्ती असल्याचे त्यांच्या चेहºयावरून जाणवत होते़ या घटनेची पुनरावृत्ती होवू नये, अनोळखी माणसाला आपली ओळख पटावी, या उद्देशानेच तृतीय पंथीयांनी हे पाऊल उचलले असावे़ या तृतीयपंथीयांपैकी एकाशी संवाद साधला तेव्हा त्यानेही या गोष्टीला पुष्टी दिली़ आम्ही गुन्हेगार नसून पोटासाठी भटकंती करीत आहोत; परंतु, अनाहूतपणे आमच्यावरही राईनपाडासारखी वेळ येऊ नये़ त्यामुळेच ओळखपत्राची सुविधा केली असल्याचे त्यांनी सांगितले़नगरसेवकांचे ओळखपत्रसंशयावरून तृतीयपंथीयांना मारहाण होऊ नये़ अशी काही वेळ आलीच तर त्यांना स्वत:चा पत्ता किंवा ओळख पटविण्यासाठी काही तरी जवळ असावे, या उद्देशाने जालना येथील नगरसेवकांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या सही शिक्क्यानिशी त्यांना ओळखपत्र पुरविले आणि हेच ओळखपत्र भटकंती करताना तृतीयपंथीयांसाठी आधार ठरू लागले आहे़

 

टॅग्स :parabhaniपरभणीDhuleधुळे