शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : भरतीसाठी ३५ ते ४० हजार युवक येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:56 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या भारतीय सैन्य दलातील भरती मेळाव्यासाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतून सुमारे ३५ ते ४० हजार उमेदवार परभणीत दाखल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या भारतीय सैन्य दलातील भरती मेळाव्यासाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतून सुमारे ३५ ते ४० हजार उमेदवार परभणीत दाखल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.४ ते १३ जानेवारी या काळात सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदांसाठी ही भरती होणार आहे. या सैन्य भरतीसाठी सध्या आॅनलाईन नोंदणी सुरू असून, १९ डिसेंबर ही नोंदणीची अंतिम तारीख आहे. परभणीसह राज्यातील ९ जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून साधारणत: ४ ते ५ हजार उमेदवार परभणीत दाखल होणार आहेत. त्यामुळे ९ दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपºयातून येणाºया युवकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने परभणी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना या प्रक्रियेसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हद्दीतील मैदान आणि विविध वसतिगृह भरती प्रक्रियेसाठी वापरले जाणार आहेत. जिल्ह्यात एकाच वेळी मोठ्या संख्येने युवक परभणीत दाखल होणार असून या युवकांची कृषी विद्यापीठातील वसतिगृहात तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरात स्वच्छतेची कामे केली जाणार आहेत. अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेला दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी मैदान आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या काळात आवश्यक असलेल्या पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर दिली आहे. तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यलयांनाही भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक असलेली जबाबदारी देण्यात आली आहे.एकंदर या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, उमेदवारांची संख्या लक्षात घेता, आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. याच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला आहे. एकंदर सैन्य भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाºया हजारो उमेदवारांना परभणीतील भरती मेळावा एक चांगली संधी घेऊन आला असल्याने हजारोंच्या संख्येने उमेदवार परभणीत दाखल होतील, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.विशेष : रेल्वे सोडण्याची विनंती४परभणी येथे ४ ते १३ जानेवारी या काळात भारतीय सैन्य भरती मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर ३ ते १३ जानेवारी या कालावधीत दररोज सुमारे ४ ते ५ हजार उमेदवार परभणीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या उमेदवारांची वाहतुकीची सुविधा व्हावी, यासाठी मनमाड ते धर्माबाद दरम्यान ३ ते १३ जानेवारी या काळात दररोज विशेष रेल्वेची व्यवस्था करावी.४ही रेल्वे दररोज सकाळी ६ वाजता परभणी येथे पोहोचेल आणि १२.३० वाजता परभणीतून सुटेल, अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच नांदेड ते मनमाड मार्गावरुन धावणाºया नियमित रेल्वे गाड्यांना या कालावधीत २ जनरल डबे वाढविण्याची विनंती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील विभागीय प्रबंधकांकडे केली आहे.या जिल्ह्यांसाठी आहे भरती४परभणी येथे होत असलेली सैन्य भरती परभणी जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी असून १९ डिसेंबर ही या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे.परभणी जिल्ह्यात होत असलेल्या सैन्य भरती मेळाव्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येणाºया सर्व संबंधित शासकीय कार्यालयातील प्रमुखांना भरती प्रक्रियेसंदर्भात आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून त्या दृष्टीने तयारी सुरु आहे. उमेदवारांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.-अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीSoldierसैनिक