शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळू घाट खरेदीकडे कंत्राटदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:18 IST

जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़यावर्षी जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडले होते़ हरित लवादाची परवानगी न मिळाल्याने ही प्रक्रिया ठप्प होती़ फेब्रुवारी महिन्यात राज्य हरित समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर ३३ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ विशेष म्हणजे त्यातील केवळ ११ वाळू घाट कंत्राटदारांनी खरेदी केले असून, उर्वरित वाळू घाटांची प्रक्रिया रखडली आहे़ लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत खरेदी न झालेल्या वाळू घाटांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु, तीनही वेळा वाळू घाटांच्या खरेदीसाठी कंत्राटदार फिरकले नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांची प्रक्रिया रखडली आहे़ सद्यस्थितीत निर्माण झालेली वाळुची टंचाई लक्षात घेता हे वाळू घाट लिलावाद्वारे वाळू उपस्यासाठी खुले होणे आवश्यक आहे़ शासनाच्या नियमानुसार तीनपेक्षा अधिक वेळा लिलाव प्रक्रिया केल्यानंतरही विक्री होत नसेल तर त्या घाटांची किंमत कमी करण्याची तरतूद आहे़ या तरतुदीनुसार १३ वाळूघाटांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले असून, तेराही वाळू घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी केल्यास या घाटांचे लिलाव होण्याची शक्यता आहे़, असे नमूद केले असून, घाटांची किंमत कमी करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़गोदावरी, दूधना, पूर्णा या तीन नद्यांवरील वाळू घाटांचे लिलाव करून त्या ठिकाणावरून वाळुचा अधिकृत उपसा केला जातो़ या वर्षात केवळ ११ घाटांचेच लिलाव झाले आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आर्थिक फटका तर सहन करावा लागतच आहे़ या शिवाय सामान्य नागरिकांना वाळू उपलब्ध होत नाही़ जास्तीत जास्त वाळू घाट खुले झाले तर वाळुची किंमत कमी होऊन बांधकाम व्यावसाय वाढीस लागू शकतो़ या सर्व पार्श्वभूमीवर १३ वाळू घाटांचे फेरलिलाव होण्याची शक्यता आहे़गोदावरी नदीवरील: १२ घाटपरभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या वाळुला मागणी आहे़ मात्र याच नदीच्या पात्रावरील वाळू घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही़ सर्वाधिक घाट गोदावरी नदीवर असून, या घाटांच्या लिलावासाठी २५ टक्के रक्कम कमी करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली आहे़ या वाळू घाटांमध्ये पिंपळगाव सारंगी, पेनूर-१, पेनूर-२, कळगाव, बाणेगाव, खरबडा-२, पिंप्री झोला, महातपुरी, भांबरवाडी, खडका, लिंबा, थार आणि दूधना नदीकाठावरील सोन्ना येथील वाळू घाटांचा समावेश आहे़ या वाळू घाटांची मूळ किंमत कमी करून हे घाट पुन्हा लिलाव प्रक्रियेत समाविष्ट करावेत, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़४या वाळू घाटांमध्ये सुमारे ७४ हजार ३८२ ब्रास वाळू उपलब्ध आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला वाळू घाटात सर्वाधिक १० हजार ६०१ ब्रास वाळू उपलब्ध असून, पेनूर-१, पेनूर-२ येथे प्रत्येकी ८ हजार ४८१, कळगाव येथे ८ हजार ६५७, महातपुरी घाटात ८ हजार ४८१, पिंपळगाव सारंगी घाटात ६ हजार ८०२, भांबरवाडी घाटात ३ हजार १८०, लिंबा घाटात ५ हजार ३०० तर सोन्ना येथील घाटामध्ये ३ हजार ८७० ब्रास वाळू उपलब्ध आहे़जिल्ह्यातील वाळू घाटांच्या किंमती लाखांमध्ये असून, यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काही परिस्थितीचा परिणामही लिलावावर झाला आहे़ त्याच प्रमाणे लिलावानंतर साधारण: २ ते ३ महिनेच वाळुचा उपसा करावा लागणार आहे़ त्यामुळे वाळू उपस्यातून फारसा फायदा होण्याची श्क्यता नसल्याने कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग