शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:04 IST

दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २६ एप्रिल रोजी पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ या प्रसंगी रस्तोगी बोलत होते़ कार्यक्रमास कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, अकोला येथून डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ विकास भाले, हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ़ रवींद्र चारी, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे व्यवस्थापक डॉ़ एऩपी़ सिंग, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, डॉ़डी़एम़ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती़रस्तोगी म्हणाले, कमी पर्जन्यमानात रुंद वरंबा व सरी पद्धतीने पिकांची लागवड केल्यास मृद व जलसंवर्धन होऊन चांगले उत्पादन घेता येते़ त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्तार कार्यकर्ते व शेतकºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ कमी पाण्यात फळबाग व्यवस्थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असून, ते शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे़मराठवाडा व विदर्भात खरिपातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे़; परंतु, ज्वारीचे पीक पाण्याचा ताण सहन करणारे असून, मानवास अन्न आणि जनावरांना चारा पुरविणारे असल्याने ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत़बीटी कपाशी ऐवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली केल्यास कमीत खर्चात शाश्वत उत्पादन घेता येईल़ तंत्रज्ञानाच्या आधारे शेतमालाचे उत्पादन वाढू शकेल़ शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी योग्य बाजारभाव, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणूक व विपणन व्यवस्था आदींचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे़, असे ते म्हणाले़पोक्रा अंतर्गत गावांत कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शेती शाळेचे आयोजन केले जाणार आहे़ प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावसमुहातील प्रत्येक गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व ग्रामसंजीवनी समितीद्वारे गावामध्ये हाती घ्यावयाच्या उपाययोजनांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी डॉ़ अशोक ढवण, डॉ़ विलास भाले, डॉ़चारी, डॉ़ सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ डॉ़ आऱएऩ खंदारे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़विजय कोळेकर यांनी आभार मानले़ कार्यशाळेस परभणी, अकोला, राहुरी कृषी विद्यापीठातील तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मुंबई येथील आयआयटी, कृषी विभागातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़५ हजार गावांमध्ये प्रकल्प४पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सध्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांसह राज्यातील ५ हजार १४२ गावांत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे़४या प्रकल्पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारशी व हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीuniversityविद्यापीठ