शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:19 IST

शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.याबाबत अ‍ॅड. परिहार म्हणाले की, मनपातील स्वीकृत सदस्यपदाच्या एका जागेवर इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. याला विरोधी पक्षनेते विजय जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह १४ नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. तसे पत्रही प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. त्यामुळे इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना महिनाभरापूर्वी झालेल्या मनपाच्या विशेष सभेत अतिक इनामदार यांच्या नावास अचानक मंजुरी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्याच सांगण्यावरुन इनामदार यांची निवड करण्यात आली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे पत्र डावलून इतरांची निवड कशी काय केली, असा सवाल केला होता. त्यानंतर याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी पक्षविरोधी कृती करणाऱ्यांवर कारवाई करु, असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले होते. त्यानंतर जवळपास २० दिवसांचा कालावधी होत आला तरीही या प्रकरणी कारवाई होत नसल्याने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असल्याचे अ‍ॅड. परिहार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा पडली फूटराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि महानगर अध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. आ.दुर्राणी हे परभणी शहरात अकारण हस्तक्षेप करतात, नगरसेवकांना काम करु देत नाहीत, असा अ‍ॅड.परिहार यांचा आरोप आहे. तर आ.दुर्राणी हे जिल्हाध्यक्ष असल्याने निर्णय घेत असल्याचे सांगत आहेत. यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीत जिल्ह्यात फूट पडल्याचे दिसून येत आहे.प्रमुख पदाधिकाºयांच्या मागणीची दखल घेतली जात नसेल आणि पदाला सन्मान दिला जात नसेल तर त्या पदावर राहून उपयोग काय? पक्ष स्थापनेपासून खा.शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सोबत आहे. यापुढेही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहणार आहे.-अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार

टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण