शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला सायकल मोर्चा काढून पेट्रोल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पेट्रोल दरवाढीसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २८ मे रोजी परभणीत जिल्हा कचेरीवर सायकल मोर्चा काढण्यात आला.मागील पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने महागाईचा भडका उडत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पेट्रोल दरवाढीसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २८ मे रोजी परभणीत जिल्हा कचेरीवर सायकल मोर्चा काढण्यात आला.मागील पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने महागाईचा भडका उडत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील काळी कमानपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल मोर्चा काढला. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकला. त्यानंतर मोर्चेकºयांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.भाजप सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. एकीकडे शेतकºयांना कडधान्य घेण्याचे आवाहन केले, मात्र हे धान्य खरेदी करण्यास शासनाने उदासीन भूमिका घेतली. जिल्ह्यात १३ हजार शेतकºयांची तूर खरेदीविना पडून आहे. ही तूर खरेदी करावी, खतांवरील सबसिडी दिली नसल्याने खताचे भावही वाढले आहेत. दुसरीकडे शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे, या परिस्थितीला केंद्र शासन जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, नितीन लोहट, माणिक कदम, भगवान शिंदे, रणजित कारेगावकर, शेख जाफर, केशव आरमळ, अजीत पवार, रामकिशन गरुड, अंगद गरुड, गजानन गरुड, ज्ञानराज चव्हाण, शिवाजी ढगे, बाळासाहेब ढगे, भास्कर खटिंग आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीPetrolपेट्रोलDieselडिझेल