शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एलबीटी वसुलीवरील स्थगिती उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:57 IST

स्थानिक संस्था कराच्या वसुलीस दिलेली स्थगिती उठवित महापालिका प्रशासनाने नव्याने करनिर्धारणा करुन स्थानिक संस्था कराची वसुली करावी, असे आदेश नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्थानिक संस्था कराच्या वसुलीस दिलेली स्थगिती उठवित महापालिका प्रशासनाने नव्याने करनिर्धारणा करुन स्थानिक संस्था कराची वसुली करावी, असे आदेश नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिले आहेत.परभणी शहरातील व्यापाºयांकडून महापालिकेमार्फत स्थानिक संस्था कर वसूल केला जात होता. हा कर लागू करणे आणि त्याच्या वसुलीसाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली.या दरम्यानच्या काळात १५ सप्टेंबर २०१७ रोजी राज्य शासनाने स्थानिक संस्था कराच्या वसुलीला स्थगिती दिली. ही करवसुली रद्द करण्याच आदेश घेतल्याने व्यापाºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. व्यापाºयांच्या बाजूने शासनाने निर्णय घेतला असला तरी शहरात जुनी थकबाकी असल्याने मनपाने जुन्या वसुलीच्या नावाने वसुली सुरूच ठेवली होती. त्यामुळे व्यापाºयांना नोटिसा पाठविणे, त्यांची दुकाने सील करण्याचे काम मनपा प्रशासनामार्फत होत होते. याविरुद्ध व्यापाºयांनी आंदोलनही केले होते.दरम्यानच्या काळात व्यापारी आणि मनपा प्रशासनचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अप्पर उपायुक्त विजयकुमार फड यांच्या समितीची स्थापना केली.या समितीने दोन्ही बाजूचे म्हणने नोंद करुन घेतले होते. या अहवालानंतर नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी शशीकांत सानप यांनी ५ एप्रिल रोजी आदेश काढले आहेत. त्यात म्हटले आहे की, स्थानिक संस्था कराची नियमानुसार परिगणना/वसुली करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याने त्याप्रमाणे सदर एजन्सीने केलेल्या कराच्या निर्धारणानुसार वसुली न करता नव्याने पर्यायी व्यवस्था निर्माण करुन कर निर्धारणा करावी, असे आदेशात म्हटले आहे.व्यापाºयांची मागणीही केली मान्ययाच आदेशात कक्ष अधिकारी शशीकांत सानप यांनी महापालिकेची निकड लक्षात घेता स्थानिक संस्था कराची वसुली करण्यास दिलेली स्थगिती उठविण्यात यावी, असेही नमूद केले आहे. स्थानिक संस्था कराची आकारणी पूर्णपणे नव्याने करावी, ही व्यापाºयांची प्रमुख मागणी विचारात घेता, जुन्या एजन्सीने केलेल्या कर निर्धारणानुसार वसुली न करता नव्याने पर्यायी व्यवस्था निर्माण करुन कर निर्धारणा करावी, असे आदेशात म्हटले आहे.सक्तीच्या वसुलीविरुद्ध केले होते आंदोलनस्थानिक संस्था कराच्या वसुलीला स्थगिती दिल्यानंतरही महापालिकेने जुनी थकबाकी वसुुुुली सुरु केली होती. त्यामुळे व्यापाºयांनी याविरुद्ध आंदोलन केले होते. बाजारपेठ बंद ठेवली होती. परिणामी शासनाने दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावरु समिती स्थापन केली होती. या समितीने परभणीत भेट देऊन प्रशासन व व्यापाºयांचे म्हणणे ऐकले होते. राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आदेश काढले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTaxकर