शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पदभार घेत नसल्याने कर्मचाऱ्याचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:09 IST

पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाखांचा धान्य घोटाळा झाल्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे़ या प्रकरणात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी गोदामपाल एस़पी़ कांबळे यांना निलंबित केले होते तर प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानंतर कदम यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांना खुलासाही दिला होता़दरम्यान, गोदामपाल कांबळे यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या जागी सुमेध वाघमारे यांची नियुक्ती केल्याचे आदेश १० जानेवारी रोजी काढण्यात आले होते; परंतु, वाघमारे यांनी २१ जानेवारीपर्यंत पदभार स्वीकारला नाही़ त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही व कर्तव्यात कसूर केला म्हणून वाघमारे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी काढले आहेत़ त्यामुळे गोदामपालाचा पदभार न स्वीकारल्याने निलंबित झालेले वाघमारे हे जिल्ह्यातील तिसरे कर्मचारी ठरले आहेत़ या पूर्वी परभणी तहसील कार्यालयातील दोन कर्मचाºयांना याच कारणास्तव निलंबित करण्यात आले होते़ त्यानंतर वाघमारे यांच्यावर कारवाई झाली आहे़मुळात गोदामपालाचा पदभार घेण्यास कर्मचारी का तयार नाहीत? यावर मात्र वरिष्ठांकडून मंथन केले जात नाही़ विशेष म्हणजे ज्या ज्या वेळी गोदामातील धान्याचा घोटाळा झाला आहे, त्या त्या वेळी फक्त गोदामपालावरच कारवाई झाली आहे़ या गोदामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी, गोदामपालावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी किंवा गोदामाची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी नियुक्त केलेले विशेष अधिकारी या पैकी कोणावरही कारवाई झालेली नाही, हे विशेष होय़कदम यांची विभाग चौकशी प्रस्तावितपालम येथील धान्य घोटाळा प्रकरणात प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक श्रीरंग कदम यांनी आपला खुलासा जिल्हाधिकाºयांकडे दिला असला तरी जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या विभाग चौकशीची शिफारस प्रस्तावित केली आहे़ यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होवू शकते़ विभाग चौकशीची प्रक्रिया ही वेळ खाऊ आहे़ त्यामुळे कदम यांच्यावर सध्या तरी कडक कारवाईचे संकेत प्रशासनाकडून मिळालेले नाहीत़४दरम्यान, पुरवठा विभागातील अनियमितता प्रकरणात सातत्याने कर्मचाºयांवरच कारवाई केली जात असल्याच्या कारणावरून कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़ अनियमिततेस अधिकारीही तेवढेच जबाबदार असल्याचे कर्मचारी खाजगीत बोलत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागfraudधोकेबाजी