शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:32 IST

सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़सावंगी म्हाळसा येथील सरपंच कौशल्या हरि आडणे आणि सदस्य शीला रमेश कंठाळे यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिला होता़ सावंगी म्हाळसा, हिवरखेडा व येलदरी कॅम्प या तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी सरपंच व सदस्यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली होती़ या याचिकेवर २० आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली़ या अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली असल्याची माहिती अ‍ॅड़ निळकंठ पावडे यांनी दिली आहे़या सुनावणी दरम्यान, अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी येथील सरपंच आणि सदस्य यांना अपात्र घोषित करण्यासाठी दिलेली कारणे जिल्हाधिकाºयांनी योग्य पद्धतीने तपासली नाहीत, प्रशासकीय अधिकाºयांनी येलदरी येथील अतिक्रमणाबाबत स्थळ पंचनामाही केला नाही़ त्यामुळे सरपंच कौशल्या हरि आडणे आणि सदस्य शीला रमेश कंठाळे यांना जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी दिला़ या आदेशामुळे तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सरपंच, सदस्याला दिलासा मिळाला आहे़ सावंगी म्हाळसा येथे सध्या माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाची सत्ता आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ज्या कारणामुळे सरपंच व सदस्याला अपात्र ठरविले होते़ ती कारणे योग्य नसल्याचे सुनावणीमध्ये निष्पन्न झाले़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती देण्याचा निष्कर्ष काढत अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी स्थगितीचे आदेश दिले असल्याचे अ‍ॅड़ पावडे यांनी सांगितले़स्थळ पंचनामा केला नसल्याचे स्पष्ट४सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविताना दोघांनीही येलदरी वसाहतीत अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता़ परंतु, ही बाब स्पष्ट करण्यासाठी प्रशासकीयस्तरावरून स्थळ पंचनामा करणे अपेक्षित होते़ हा स्थळ पंचनामा न करताच अपात्रतेचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने आदेशाला स्थगिती दिली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीsarpanchसरपंचcollectorजिल्हाधिकारी