शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

परभणी : निलंबित तलाठी महिनाभरातच पुन्हा रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:35 IST

जास्तीची जमीन दाखवून एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान वाटप करुन शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांना महिनाभरातच शासकीय पूर्नस्थापित करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जास्तीची जमीन दाखवून एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान वाटप करुन शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांना महिनाभरातच शासकीय पूर्नस्थापित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गंगाखेड उपविभागातील तलाठी निलंबन महिनाभरातच संपुष्टात आणल्याचा दुसरा प्रकार समोर आला आहे.गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाअंतर्गत २०१७-१८ मधील कापूस बोंडअळी अनुदान वितरित करण्यात आले होते. या संदर्भातील सातबारांची मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. त्यामध्ये मसला येथील कौडाबाई राजाराम घोडके यांचे सर्वे नं.९७/०१ मधील क्षेत्र ०.५५ आर असून त्यांच्या नावे कापूस बोंडअळीचे अनुदान यादी क्रमांक ६३ मध्ये ०.७० आर दाखविले आहे. प्रत्यक्षात ०.१५ आर क्षेत्र जास्तीचे दाखविण्यात आले होते. उद्धव तुकाराम शिंदे यांची सर्वे क्रमांक ६७/अ/१ मध्ये १ हेक्टर १० आर आहे. तसेच सर्वे नं.६६/ब/१ मध्ये ०.४४ आर जमीन आहे. अशी एकूण शिंदे यांच्या नावावर १ हेक्टर ५४ आर जमीन आहे; परंतु, सदरील कापूस बोंडअळी अनुदान यादीमध्ये एकाच सर्वे नं.मध्ये डबल नाव टाकून ०.७० आर व १ हेक्टर ५० आर असे मिळून २ हेक्टर २० आर अनुदानाच्या यादीत नाव होते. म्हणजेच जमीन जास्तीची दाखवून एकाच व्यक्तीच्या नावावर दोनदा अनुदान दिले. सातबारापेक्षा जास्तीचे क्षेत्र दाखवून तलाठी आर.डी.भराड यांनी शासनाची दिशाभूल केली. याबद्दल त्यांना १५ सप्टेंबर रोजी निलंबित केले होते. त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी या संदर्भात गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे यांनी तलाठी भराड यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना शासकीय सेवेत पुनर्स्थापित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. त्यांची पदस्थापना मालेवाडी सज्जा येथे करण्यात आली आहे. या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, तलाठी भराड यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता बोंडअळीची यादी तयार केली आहे. त्या यादीमध्ये संगणकीय चूक झाल्यामुळे उद्धव तुकाराम शिंदे यांचे नाव डबल आल्यामुळे ०.४० आर शेत जमीन (प्रत्यक्ष अहवालात ७० आर जमिनीची नोंद आहे) नजर चुकीने वाढली आहे. तसेच कौडाबाई राजाराम घोडके यांचे देखील केवळ ०.१५ आर शेत जमिनीचे अनुदान नजर चुकीने जास्तीचे गेले आहे. दोन्ही खातेदारांकडून त्यांची वाढीव रक्कम देण्यास त्यांनी संमती दिली आहे. (रक्कम शासनाकडे परत भरली की नाही, याचा आदेशात उल्लेख नाही) या संदर्भातील अर्जदार कालिदास तुकाराम शिंदे यांनी उपोषणास बसू नये म्हणून धारकाने प्रयत्नशील राहिल, तरी त्यांची चुकभूल झालेली क्षमा करावी आणि भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही. त्याची काळजी घेईल. त्यामुळे धारकांच्या (तलाठी भराड यांच्या) विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना शासकीय सेवेत पूर्नस्थापित करण्याबाबत विनंती केली आहे. गंगाखेड तहसीलदार यांनी तालुक्यात चार तलाठी सज्जे रिक्त असून एक तलाठी सध्या निलंबित आहे. त्यामुळे सदर गावचा अतिरिक्त पदभार दुसºया तलाठ्यांना न मिळाल्यामुळे अतिरिक्त सज्जावरील कामाचा बोजा येत असल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास अडचणी येत आहे, असे निदर्शनास आणले आहे. त्यामुळे तलाठी भराड यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना शासकीय सेवेत पुनर्स्थापित करण्यात येत असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गावंडे यांनी काढले आहेत.मुलगीर यांच्यानंतर भराड पुन्हा सेवेत४गंगाखेड उपविभागातील पालम तालुक्यातील फरकंडा सज्जाचे तलाठी सतीश ज्ञानोबा मुलगीर यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी २८ आॅगस्ट रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी २८ सप्टेंबर रोजी सेवेत पुनर्स्थापित करण्याचा विनंती अर्ज उपविभागीय अधिकाºयांकडे दिला. त्याच दिवशी त्यांचे निलंबन संपुष्टात आणण्याचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर आता गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांचे निलंबन संपुष्टात आणल्याचा निर्णय महिनाभरातच घेण्यात आला आहे. भराड यांना १५ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. १ आॅक्टोबर रोजी सेवेत पुनर्स्थापित करण्याचा अर्ज त्यांनी दिला. १५ आॅक्टोबर रोजी महिनाभरातच त्यांचे निलंबन संपुष्टात आणून सेवेत पुनर्स्थापित करण्यात आले.चौकशी निर्णयाधीन राहून आदेश४तलाठी भराड यांच्याविरुद्ध प्रस्तावित असलेल्या विभागीय चौकशीतील अंतिम निर्णयाच्या आधीन राहून त्यांना शासकीय सेवेत पूर्नस्थापित करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी गावंडे यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे भराड यांच्या पूर्नसेवेचा मार्ग मोकळा झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग