शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सुरेश नागरे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी, फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:39 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नामनिर्देशनपत्रावर बनावट स्वाक्षरी केल्याचा जाब विचारणाऱ्या नगरसेविकेच्या मुलास जातीवाचक शिवीगाळ करून फसवणूक केल्या प्रकरणी परभणी येथील सत्र न्यायालयाच्या आदेशाने भाजपाचे जिंतूर येथील नेते सुरेश नागरे यांच्या विरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी व फसवणुकीचा सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नामनिर्देशनपत्रावर बनावट स्वाक्षरी केल्याचा जाब विचारणाऱ्या नगरसेविकेच्या मुलास जातीवाचक शिवीगाळ करून फसवणूक केल्या प्रकरणी परभणी येथील सत्र न्यायालयाच्या आदेशाने भाजपाचे जिंतूर येथील नेते सुरेश नागरे यांच्या विरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी व फसवणुकीचा सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिंतूर येथील नगर परिषदेच्या सदस्या पार्वती बहिरट यांची नामनिर्देशन पत्रावर सुरेश नागरे यांनी बनावट स्वाक्षरी का केली? याचा जाब विचारण्यासाठी त्यांचा मुलगा चंद्रकांत बहिरट हा नागरे यांच्याकडे गेला होता़त्यावेळी सुरेश नागरे यांनी त्यास जातीवाचक शिवीगाळ करून बेईज्जत केले होते़ त्यानंतर चंद्रकांत बहिरट यांनी या प्रकरणी जिंतूर येथील पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती़ परंतु, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नाही़ त्यामुळे बहिरट यांनी परभणी येथील सत्र न्यायालयात धाव घेतली़ या प्रकरणी १६ जून रोजी परभणी येथील सत्र न्यायालयाचे न्या़ डी़व्ही़ कश्यप यांनी अंतिम युक्तीवादानंतर जिंतूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बहिरट यांच्या तक्रारीची दखल घेऊन सुरेश नागरे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्या विरूद्ध तपास करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार १७ जून रोजी नागरे यांच्या विरोधात जिंतूर ठाण्यात फसवणूक व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी