शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वैद्यकीय प्रवेशाच्या प्रादेशिक आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:53 IST

वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेला ७०/३० टक्के प्रादेशिक आरक्षणाचा फॉर्म्यूला रद्द करावा, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या नेतृत्वाखाली परभणीतील विद्यार्थ्यांनी २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेला ७०/३० टक्के प्रादेशिक आरक्षणाचा फॉर्म्यूला रद्द करावा, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या नेतृत्वाखाली परभणीतील विद्यार्थ्यांनी २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला.वैद्यकीय प्रवेशासाठी ७०/३० हा फॉर्म्यूला मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. या आरक्षणामुळे हजारो गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत. मराठवाड्यात केवळ ६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी केवळ ६५० जागा असून विदर्भात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १४५० जागा आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याने या फॉर्म्यूल्याच्या विरोधात मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला.येथील वसमतरोडवरील शिवाजी महाविद्यालयासमोरुन या मोर्चाला सुरुवात झाली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा, ७०/३० चा फॉर्म्यूला रद्द करा, असे फलक घेऊन विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. वसमतरोडमार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, अरुण पवार, सुधाकर सोळंके, उद्धवराव देशमुख, अ‍ॅड.राजकुमार भांबरे, डॉ.राजू सुरवसे, सुभाष जावळे, सोनाली देशमुख, रितेश जैन, प्रा.कनके, प्रभाकर रन्हेर, राजू शिंदे, सुभाष काळे, प्रसाद नारळे, तुकाराम सांगळे, पी.आर.जाधव, अजय देशमुख, तुकाराम साठे, ज्ञानोबा पौळ, माधव कदम, श्रीकांत सरोदे, डॉ.कल्याण कदम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीMedicalवैद्यकीयagitationआंदोलन