शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आले तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:50 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत सदरील विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्याच्या कारणावरुन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. असे असले तरी येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे मात्र वेगळेच आहे. कृषी महाविद्यालयातील काही प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी सातत्याने तणावात आहेत. विशेषत: वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. महाविद्यालयात शैक्षिणक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात नाहीत. या संदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या बोलावून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली जाते. विद्यापीठ परिसरातील सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. बाहेरील व्यक्ती या परिसरात फोटोग्राफी करतात, त्यांच्यासोबत अवैध हत्यारे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण होते. तसेच या बाहेरील व्यक्ती महाविद्यालय परिसरात जोराने वाहने चालवितात, स्टंटबाजी करतात, वाहने चालविण्याचे प्रशिक्षणही महाविद्यालयाच्या मैदानावरच सुरु असते. याबाबत विचारणा केल्यास विद्यार्थ्यांनाच दमदाटी केली जाते. यातून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खेळाच्या मैदानाचा गैरवापर केला जात असतानाही येथील वरिष्ठ केवळ बघ्याची भूमिका घेतात, अशाही विद्यार्थ्याच्या तक्रारी आहेत. बाहेरील व्यक्तींचा वावर येथे अधिक असल्याने विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनाही घडत आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर विद्यार्थिनींनाच गप्प बसण्यास सांगितले जाते. अशाही तक्रारी आहेत.प्राचार्यांची तकलादू भूमिका४कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्यालयी राहत नाहीत. ते बाहेरगावाहून ये-जा करतात. त्यांच्याकडे विद्यार्थी तक्रारी करण्यासाठी गेल्यास त्याची दखल घेतली जात नाही. समूहाने विद्यार्थी गेल्यानंतर एका-एका विद्यार्थ्याला तक्रार करण्यास येण्यास सांगितले जाते. त्यानंतर एक-एक विद्यार्थी तक्रार करण्यास गेल्यास त्याला वैयक्तिकरित्या टार्गेट केले जाते, त्याची शैक्षणिक कामगिरी काय आहे ? त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क अदा करायचे असल्यास त्यासाठी तगादा लावणे आदी प्रकार केले जातात. तसेच प्रात्याक्षिक परीक्षेत गुण कमी देण्याची धमकी दिली जाते, अशाही विद्यार्थ्याच्या तक्रारी आहेत. प्राचार्यांच्या तकलादू भूमिकेचा विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याचेही या संदर्भात राज्य शासनाकडे तक्रार नमूद करण्यात आली आहे.निकाल वेळेवर लागेनात४कृषी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील सत्राचे नियोजन करता येत नाही. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरु असताना विद्यापीठ प्रशासन मात्र या संदर्भात गांभीर्याने दखल घेत नाही, अशाही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीStudentविद्यार्थीexamपरीक्षा