शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शिक्षक, प्राध्यापकांच्या उपोषणाला जोरदार प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:33 IST

जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याला शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये आंदोलने केले जात आहे. १ आॅक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. १ आॅक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी या साखळी उपोषणाला सुरुवात केली. २ आॅक्टोबर रोजी खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक व प्राचार्यांनी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उपोषण केले. यावेळी प्राचार्य डॉ.वसंत भोसले, प्रा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे, प्रा.डॉ.सुनील मोडक, संजय धर्माधिकारी, शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे, सुनील काकडे, शिक्षक संघटनेचे डी.सी. डुकरे, चंद्रकांत मोरे, ज्ञानेश्वर लोंढे, मुंजाजी गोरे, विनोद कनकुटे, मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, आनंद देशमुख, भाजपाचे मोहन कुलकर्णी, बाळासाहेब पवार, देविदास उमाटे, विश्वंभर काटवटे, जगदीश जोगदंड, महेश पाटील, गिरीष पिंपळगावकर, संतोष गायकवाड, माधव घयाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीकांत क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.पंढरीनाथ धोंडगे यांनी आभार मानले. उपोषणा दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, विधानसभा प्रमुख माणिक पोंढे, नगरसेवक अतुल सरोदे आदींनी भेट दिली.आज वारकºयांचे उपोषणसाखळी उपोषणामध्ये ३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील वारकरी सहभाग नोंदविणार आहेत. परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे, यासाठी वारकरी मंडळीही उपोषण करुन मागणी रेटून धरणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय