शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शिवजयंतीची जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:12 IST

‘एक शहर एक जयंती’ या संकल्पनेतून परभणीत सार्वजनिक शिवजयंती सोहळा सोमवारी साजरा केला जात आहे़ शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार असल्याने ही मिरवणूक आकर्षण ठरणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ‘एक शहर एक जयंती’ या संकल्पनेतून परभणीत सार्वजनिक शिवजयंती सोहळा सोमवारी साजरा केला जात आहे़ शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार असल्याने ही मिरवणूक आकर्षण ठरणार आहे़१९ फेब्रुवारी रोजी परभणी शहरात शिवजयंती साजरी केली जात आहे. सर्वसमावेशक आणि व्यापक स्वरुपात शिवजयंती साजरी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून महिला, पुरुष, युवक, युवतींना सहभागी होता यावे, यासाठी दुपारी ३ वाजता शिवजयंती मिरवणूक काढली जाणार आहे़ येथील शनिवार बाजार येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. शिवाजी चौक, गांधी पार्क, विसावा कॉर्नरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येईल़ मिरवणुकीत अंबारीसहीत हत्ती, शिवरायांची मूर्ती, ५१ घोडे, ५१ ऊंट, तलवारबाजी महिलांचे पथक, हलगी पथक, मल्लखांब, गोंधळी, झांज पथक, ढोल पथक आकर्षण राहणार आहे़ मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे़ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यावरही हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे़विशेष म्हणजे, सार्वजनिक शिवजयंती मिरवणुकीचे ड्रोण कॅमेºयाद्वारे छायाचित्रणही केले जाणार आहे़ मिरवणुकीत सहभागी होणाºया नागरिकांसाठी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ शिवप्रेमी नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे़विद्युत रोषणाईला मनपाचा खोदरवर्षी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता, रंगरंगोटी व विद्युत रोषणाई केली जाते़ जयंतीच्या एक दिवस अगोदरच महापालिकेमार्फत ही कामे केली जातात़ मात्र यावर्षी मनपाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई केली नाही़ तसेच दिवसभरात स्वच्छतेची कामेही झाली नाहीत़ त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे़

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजparabhaniपरभणी