शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत रस्त्यालगतचे साहित्य केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:57 IST

शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी मंगळवारी शहरात मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील सर्व साहित्य जप्त केले आहे. या मोहिमेमुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून मोहिमेचे स्वागत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी मंगळवारी शहरात मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील सर्व साहित्य जप्त केले आहे. या मोहिमेमुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून मोहिमेचे स्वागत होत आहे.परभणी शहरातील स्टेशनरोड, गांधी पार्क, गुजरी बाजार आणि इतर प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजुला अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली होती. वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने मंगळवारी ही मोहीम राबवून रस्ते वाहुकीसाठी मोकळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक खान, महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे विनय ठाकूर, होर्डिग्ज विभागाचे डॉ.विनोद ननवरे यांच्यासह कर्मचाºयांनी सकाळपासूनच या मोहिमेला सुरुवात केली. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही मोहीम सुरु झाली. स्टेशनरोड, नारायणचाळ, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर ते महाराणा प्रताप चौकापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने या भागातील व्यापाºयांनी त्यांच्या दुकानातील साहित्य, नामफलक, दुकानाची जाहिरात करणारे फलक रस्त्यावरच दर्शनी भागात लावले होते. या साहित्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असे. काही किरकोळ व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेलाच टेबल, खुर्च्या टाकून चहा- पान स्टॉलचे दुकान सुरू केले होते.