शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

परभणी: गोदावरी पात्रातील वाळू चोरीला लगाम लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:53 IST

गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे.तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातील वाळूला मोठी मागणी आहे;परंतु, वाळू धक्याचा लिलाव मागील वर्षापासून झाला नसल्याने वाळू माफियांनी नदीपात्रात चांगलाच धूडगूस घालीत वाळू दिसेल तेथून रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा चालविला. यामुळे गोदावरी नदीपात्रात पहावे तेथे खड्डे निर्माण झाले आहेत. यातच तालुक्यात गोदावरी नदीपात्रात असलेल्या १३ वाळू धक्यांपैकी केवळ २ वाळू धक्यांचा चालू वर्षात लिलाव झाला असल्याने वाळू चोरीला वाव मिळत आहे.गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना होत असलेल्या वाळू चोरीमुळे गोदाकाठच्या गावातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने गोदाकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदीपात्रातून होणारी ही वाळू चोरी रोखण्यासाठी गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या. त्याच बरोबर तलाठ्यांनीही वाळू माफिया आमचे ऐकत नाहीत, कार्यवाही केल्यानंतरही वाळूचा बेसुमार उपसा होत असल्याचा लेखी स्वरुपातील अहवाल तहसील कार्यालयात सादर करून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. यामध्ये तलाठ्यांबरोबरच गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनीही तलाठ्यांच्या अहवालावर आपल्या स्वाक्षºया केल्या आहेत. मात्र विनापरवाना होणारी वाळू चोरी रोखण्यात महसूल प्रशासनाला आजपर्यंत यश आले नसल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवरच नागरिकातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.तालुक्यातील गौंडगाव, मैराळ सावंगी, धारासूर, झोला पिंपरी, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, चिंचटाकळी येथील गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेऊन वाळूमाफिया ही वाळू पिंपळदरी, राणीसावरगाव, कोद्री, परळी रोड, भारस्वाडा मार्गे परभणी आदी मार्गावरून तालुक्याबाहेर हलवित आहेत. प्रशासनाची नजर चुकविण्यासाठी वाळूने भरलेली वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताच्या घटनेतही वाढ होत आहे.मागील महिन्यात २२ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेले हायवा वाहन भरधाव वेगात पिंपळदरीकडे जात असताना या ट्रकने खोकलेवाडी पाटीजवळ सुधाकर विठ्ठलराव बोके (रा. खोकलेवाडी) यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले होते. त्याच बरोबर किरकोळ घटनाही घडत आहेत. त्यामुळे याकडे तालुका महसूल प्रशासनासह जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी अवैध वाळू उपशाला लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.महसूलच्या हालचालीवर पंटरची पाळत४महसूल प्रशानाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वाळू माफियांनी रोजंदारीवर पंटर नेमले आहेत. हे पंटर महसूल प्रशासनाच्या बारिक-सारिक हालचालींची माहिती वाळू माफियांना देत असल्याने वाळूची चोरी वाढली असल्याचे दिसत आहे. यामध्ये गंगाखेड शहरात पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, कोद्री रेल्वे फाटक, बसस्थानक परिसरातील पालम नाका रेल्वे फाटकाजवळ, परळी नाका, खळी पाटी, महातपुरी फाटा आदी ठिकाणी पंटरकडून माहिती दिली जात आहे. ही माहिती मिळाल्यास वाळूमाफिया आपली वाळूची वाहने तातडीने इतरत्र हलवित असल्यामुळे कार्यवाहीसाठी आलेल्या अधिकाºयांच्या हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाला हे वाळूमाफिया वरचढ होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूgodavariगोदावरी