शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सेलू शहरात उभ्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:51 IST

जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़सेलू तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याबरोबरच मागील काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना सेलूकरांना करावा लागत आहे़ उन्हाचा पारा ४०-४२ करीत ४५ अंशावर पोहचल्याने नागरिक त्रस्त आहेत़ दिवसा घराबाहेर पडणेही अवघड होईल, असे ऊन सेलूकरांना त्रस्त करून सोडत आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाचा त्रास वाढला आहे़ शेतांमध्ये पिके शिल्लक नसली तरी रबी हंगामातील ज्वारी व इतर पिके काढून ठेवली आहेत़ त्यामुळे शेतशिवार ओसाड पडले आहे़ शेतांमध्येच ठिक ठिकाणी ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवल्या असून, दिवसभराच्या उष्णतेने या पेंढ्या पेट घेत आहेत़ त्यामुळे तालुक्यात कडब्याला आग लागण्याच्या घटनांही वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ शुक्रवारी शहरात एका कारने पेट घेतल्याची घटना घडली़ अचानक कार पेटल्याने परिसरातील नागरिकांना काय झाले ते समजलेच नाही; परंतु, शनिवारी दिवसभर ऊन वाढले होते़ रात्रीही उष्णता अधिक प्रमाणात होती़ त्यातूनच कारने पेट घेतल्याची घटना घडली़उभी कार जळून खाकसेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एमएच ११ सीजी-७४४३ या क्रमांकाच्या कारला शुक्रवारी रात्री ८़३० च्या सुमारास अचानक आग लागली़ सातारा येथील परशूराम दावडकर व बाळासाहेब सावंत हे दोघे मोबाईल टॉवरची दुरुस्ती करण्यासाठी परभणीहून आले होते़ दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतल्याचे लक्षात आले़ नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत अग्नीशमन दलास पाचारण केले़ मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली़ सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही़ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीcarकारfireआग