शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

परभणी : एनआरसी विरोधात सोनपेठ, मानवतमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:08 IST

केंद्र शासनाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शनिवारी मानवत, सोनपेठ, चारठाणा येथे मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शनिवारी मानवत, सोनपेठ, चारठाणा येथे मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.सोनपेठ शहरात कायद्यांचा निषेध करीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यानंतर मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तहसीलदार आशिषकुमार बिरादार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दशरथ, सूर्यवंशी, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, माजी जि. प. सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, नगरसेवक अ‍ॅड.श्रीकांत विटेकर, मारोती रंजवे, शिवाजी कदम, भगवान राठोड, रवींद्र देशमुख, सुशीलकुमार सोनवणे, रामेश्वर पंडीत, बळीराम काटे, काजी समीयोद्दीन काजी, गफार हाफीज, सद्दाम हुसेन, रफिक कुरेशी, अब्दुल रहेमान, जिलानी कुरेशी, उस्मानबाबा कुरेशी, नजीर राज, गौस कुरेशी, सैफुल्ला सौदागर, अजिम शेख, जावेद अन्सारी, नासेर पठाण, खुर्शीद अन्सारी, हाफीज आसोमा, सलमान शेख, बुºहाण शेख, अनिस खुरेशी, खदीर टेलर, हाफेज युसुन, हाफेज मुस्तफा शमीम, सिध्दीक काजी, मंजुर मुल्ला, शेख युनुस, फेरोज शेख जावेद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम युवक व नागरिक सहभागी झाले होते.यावेळी पोलीस निरीक्षक गजानन भातलंवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मानवतमध्ये कडकडीत बंदमानवत : शहरात या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी बडी मशिद ते महाराणा प्रताप चौक पर्यंत मोर्चा काढण्यात आला़ पाथरी-मानवत रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ दरम्यान, शनिवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती़सकाळी ११़३० वाजता मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा क्रांतीचौक, मंत्री गल्ली, कापडचौक, पोलीस ठाणे, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, आठवडी बाजार, बसस्थानक मार्गे महाराणा प्रताप चौकात मोर्चा पोहचताच आंदोलनकत्यार्नी पाथरी - परभणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनामुळे एस टी बसेस मानवत आणि पाथरी बसस्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. प्रशासनाकडून तहसीलदार डी डी फुपाटे, नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.चारठाणा येथील जामा मस्जिद ते हुतात्मा स्मारक परिसरपर्यंत शनिवारी सकाळी ११ वाजता मुकमोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाचे हुतात्मा स्मारक परिसरात विसर्जन करण्यात आले. यावेळी मौलाना फजलोद्दिन, मौलाना खुद्दुस,मौलाना गफार,नानासाहेब राऊत, अमोल भवरे, किरण देशमुख आदींनी मार्गदर्शन केले. प्रशासनाच्या वतीने जिंतूरचे नायब तहसीदार एच.आर. सोनवणे व चारठाणा सज्जाचे तलाठी पवार यांनी निवेदन स्विकारले. सदर मोर्चात सय्यद अकबर अली, मधुकर भवाळे, किरण देशमुख, उपसरपंच तहेसीन देशमुख, सलीम काजी, असगर देशमुख, कासीम कुरेशी, सय्यद इम्रान, जलील इनामदार, सय्यद रहेमत अली, सय्यद खैसर, विष्णु वानखरे, नाना निकाळजे, अमोल भवरे, उमाजी निकाळजे, गेंदेखाँ पठाण, शेख सुलेमान, साबेर पठाण, बद्रोद्दीन काजी, हनुमंत चव्हाण, कासीम इनामदार, सय्यद मुजाहेद, विजय रामपुकर, रेखा राठोड, वाजेद कुरेशी, बाबासाहेब मेहेत्रे, निसार देशमुख, अलीमोद्दीन काजी, शेख निहाल, लायक कुरेशी, नईमोद्दिन काजी, शेरखाँ पठाण, युसुफ पटेल, शेख रफीक, मुजीब मिर्झा, सय्यद मजहर अली, सय्यद तालेब अली, जुबेर मिर्झा, शेख खलील, विजय निकाळजे, सय्यद दाऊत अली, वसंता निकाळजे, मौलाना उमर, मौलाना मुबारक, मौलाना रिजवान, मौलाना अन्वर यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन