शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस गैरहजर २२ बीएलओंना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:13 IST

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अनुस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील २२ बीएलओंना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अनुस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील २२ बीएलओंना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत़लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीकोणातून छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम सध्या राबविण्यात येत आहे़ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़या बैठकीस २२ बीएलओ गैरहजर असल्याचे दिसून आले़ या गैरहजर बीएलआेंना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांना यावेळी देण्यात आले आहेत़ गैरहजर बीएलओंना नोटीस दिल्यानंतर त्यांच्याकडून तातडीने खुलासा मागवून घ्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले़ यावेळी जिल्हाधिकाºयांनी मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला़भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत नव मतदारांची नोंदणी, दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, लिंग, फोटो आदी दुरुस्तीचे काम सुरू आहे़ मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री बीएलओ किंवा तहसील कार्यालयात जाऊन करावी, असेही यावेळी आवाहन करण्यात आले़ यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले, उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे आदींची उपस्थिती होती़प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरूलोकसभा निवडणूक मार्च किंवा एप्रिल २०१९ मध्ये होण्याची शक्यता आहे़ त्यानुसार भारत निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे़ या अनुषंगाने मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ यासाठी बीएलओंची बुधवारी परभणीत कार्यशाळा घेण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक