शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाण्यासाठी जमिनीची केली जातेय चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:55 IST

तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोधात जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे.तालुक्यात डिसेंबर महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. चार वर्षापासून सातत्याने दुष्काळीची परिस्थिती असल्याने यावर्षी पाण्याची टंचाई वाढली आहे. मागील वर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून दोन महिन्यांपूर्वी पाणी सोडले होते. या पाण्याने काही काळ तग धरला. आता मात्र पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. बागायती केळी, ऊस ही पिके हातची गेली आहेत. शेतकरी पाण्यासाठी विहिरींचे खोदकाम करीत आहेत. ५० ते ६० फूट विहीर खोदूनही पाणी लागत नाही. तर बोअरवेल ५०० फुटापर्यंत खोदल्यानंतरही कोरडा फुफाटा बाहेर पडत आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी खोलवर खोदूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचा हिरमोड होत आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात चार महिन्यांमध्ये १०० बोअर खोदण्यात आले. एक बोअर घेण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यातील बोअरवरील खर्चाचा अंदाज लावला तर ४० लाख रुपये केवळ पाणी शोधण्यासाठी खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे बोअर खोदकामावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.२ हजारांपेक्षा अधिक: तालुक्यात बोअरवेल४डिसेंबर २०१८ पासूनच तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पाण्यासाठी बोअर खोदकामावर भर दिला आहे. मागील चार महिन्यांमध्ये तालुक्यात सुमारे २ हजार पेक्षा अधिक बोअर घेण्यात आले. विशेष म्हणजे यातील अनेक बोअर ५०० फुटापर्यंत खोदले. खोलवर बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने खोदकामावरील खर्च वाया जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली असून सिंचनासाठीही पाणी नसल्याने बागायती पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.जायकवाडीचे पाणी मिळाल्यास टंचाई होईल शिथिल४पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातून गेला आहे. दोन महिन्यांपूर्वी या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे टंचाई शिथिल झाली होती;परंतु, आता परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.४या प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा कालव्याला सोडले तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. शिवाय कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढून विहिरी, हातपंपांना पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी