शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

परभणी : कीटकनाशक विषबाधेचा वीस दिवसांत दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:12 IST

खरीप हंगामातील पिकांवर कीटकनाशक फवारताना जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी व सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील दोन शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने मृत्यू ओढावला आहे; परंतु, एकामागून एक मृत्यूची घटना घडत असताना कृषी विभागाकडून मात्र फवारणी विषयी कोणतीच जनजागृती करण्यात येत नसल्याने हा विभाग सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. माहितीच्या अभावामुळे शेतकरी असुरक्षित असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पिकांवर कीटकनाशक फवारताना जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी व सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील दोन शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने मृत्यू ओढावला आहे; परंतु, एकामागून एक मृत्यूची घटना घडत असताना कृषी विभागाकडून मात्र फवारणी विषयी कोणतीच जनजागृती करण्यात येत नसल्याने हा विभाग सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. माहितीच्या अभावामुळे शेतकरी असुरक्षित असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.फवारणी करताना दोन ते तीन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरु झाले होते. फवारणी विषयीची तंत्रशुद्ध माहिती नसल्याने शेतकºयांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घटना राज्यभर गाजल्यानंतर शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढून कृषी विभागातील अधिकाºयांनी गावागावात जाऊन फवारणी कशी करावी आणि फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातील कृषी विभागात दिसून येत आहे. कृषी विभागाने यावर्षी राज्य शासनाच्या आदेशाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पिकांना कीटकनाशक व रोगराईपासून बचावासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते; परंतु, फवारणी कशी करावी, याबाबत कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात घडलेला प्रकार परभणी जिल्ह्यात घडू पाहतो की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत कृषी विभागातील अधिकाºयांनी वरातीमागून घोडे दमटत अर्ध्याहून अधिक फवारणी संपत आल्यानंतर जनजागृतीस सुरुवात केली. जिल्ह्यात ८४८ गावे असल्याने मे महिन्यापासून कृषी विभागाने फवारणीविषयी जनजागृती करणे अपेक्षित होते; परंतु, तसे झाले नाही. २४ आॅगस्ट रोजी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेतकरी कापूस फवारणी करीत असताना कीटकनाशक अंगावर पडल्याने त्याचा प्रभाव होऊन अण्णासाहेब रामजी जीवणे यांचा २४ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे आता कृषी विभागाच्या जनजागृतीचा प्रश्न ऐरणीवर आला.किमान कौसडी येथील घटना घडल्यानंतर कृषी विभाग कीटकनाशकाची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकºयांमध्ये जाऊन प्रभावीपणे जनजागृती करेल, अशी अपेक्षा होती; परंतु, क्रॉप सॅप व कागदोपत्री मेळावे घेऊन आम्ही जनजागृती करीत आहोत, हे दाखवत जनजागृतीला फाटा दिला.या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील नितीन महादेव गजमल (२१) हा तरुण शेतकरी शेतामध्ये फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने १४ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २० दिवसांत दोन शेतकºयांचा बळी गेला; परंतु, दुसºया घटनेनंतरही कृषी विभाग सुस्तच असल्याचे दिसून येत आहे.विभागीय कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी याकडे लक्ष देऊन फवारणी विषयीची जनजागृती हा कार्यक्रम जिल्ह्यात प्राधान्याने राबवावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.शिंदे टाकळी : शेतकरी विषबाधेने मृत्यूमुखी४पिकांवरील अळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करत असताना विषबाधा झालेल्या एका २१ वर्षीय तरुण शेतकºयाचा १४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती.४तालुक्यातील शिंदे टाकळी येथील नितीन महादेवराव गजमल (२१) हा तरुण शेतकरी आपल्या शेतातील कापसावर १४ सप्टेंबर रोजी फवारणी करीत होता. त्याला अचानक त्रास होऊ लागल्याने सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु, येथे उपचार झाले नाहीत.४ परभणी येथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नितीन यास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते; परंतु, १४ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. शिंदे टाकळी येथे १५ सप्टेंबर रोजी नितीन गजमल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे.कृषी विभाग खाजगी कंपनीच्या भरोस्यावर४जिल्ह्यातील शेतकºयांना फवारणीची माहिती देण्यासाठी गोदरेज अ‍ॅग्रीवेट कंपनी या खाजगी कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून फवारणी संदर्भातील माहिती शेतकºयांना दिली जात आहे. ही कंपनी जनजागृतीसाठी नियुक्त केली असली तरी कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. विशेष म्हणजे एकच चित्ररथ जिल्ह्यात फिरवला जात आहे. कृषी विभागातील अधिकाºयांकडून फवारणीसाठी गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याने शेतकºयांसमोर असुरक्षितता निर्माण झाली आहे.दीड महिन्यात ३३ जणांवर उपचार४पिकांवर फवारणी करीत असताना कीटकनाशकामुळे चक्कर, मळमळ, अंगाला खाज येणे, घाम येणे, डोळे लाल होणे असे प्रकार सेलू तालुक्यातील फवारणी करणाºया शेतकºयांवर आढळून आले आहेत.४दीड महिन्यात सेलू उपजिल्हा रुग्णालयात या प्रकारचे ३३ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील सहा रुग्णांना परभणीत पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर उर्वरित रुग्णांवर उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी दिली.महिनाभरापूर्वी सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथे शेतकºयांना फवारणी संदर्भात तालुका कृषी कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून जनजागृती सुरु आहे.- अनंत कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सेलूमी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा कृषी अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला आहे. या संदर्भात माहिती घेतो.-संतोष आळसे, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी