शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : धान्य घोटाळ्याचा तपास पडला अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:09 IST

येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात आॅगस्ट २०१६ मध्ये २८ कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्या प्रकरणी ३७ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला होता़ या प्रकरणातील २३ आरोपींना अटक करण्यात आली़ या सर्व आरोपींना जामीनही मिळालेला आहे़ उर्वरित आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला असून, १४ पैकी ९ आरोपी हे शासकीय अधिकारी आहेत़ तर खाजगी पाच आरोपी आहेत़ ८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौºयाच्या वेळी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यात वाद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पानसरे यांनी इतर अधिकाºयांना सोपविण्याची विनंती विशेष पोलीस महानिरीक्षकांना केली होती़ त्यानुसार हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांना हे प्रकरण तपासासाठी आॅक्टोबर महिन्यात सोपविण्यात आले़ त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांपासून गुंजाळ यांनी या प्रकरणात एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी आहे़ तर परभणीतील एक बडा उद्योजक आहे़ या खाजगी आरोपींना अटक करण्याबाबत गुंजाळ यांना काय अडचण येत आहे? हे समजत नाही़ परभणीहून हिंगोलीकडे तपास वर्ग झाल्यानंतर या तपासाला गती येईल, अशी परभणीकरांची अपेक्षा होती़ परंतु, गुंजाळ यांनी ही अपेक्षा पूर्णत: फोल ठरविली आहे़ विशेष म्हणजे तब्बल दीड वर्षांचा कालावधी या प्रकरणाला झाल्यानंतरही एकही संघटना या विरोधात आता बोलत नाही़ परिणामी या प्रकरणातील आरोपी आता उजळमाथ्याने फिरत आहेत़ शिवाय शासकीय सेवेतील निलंबित झालेले अधिकारी सेवेत पुनर्रस्थापित झाले आहेत. तर अन्य आरोपी शासकीय पगार घेऊन आरामात नोकरी करीत आहेत़वरिष्ठ अधिकाºयांनीही दिले आरोपींना अभयपरभणीच्या धान्य घोटाळ्यात दोन उपजिल्हाधिकाºयांसह तब्बल ९ शासकीय अधिकारी व कर्मचारी आरोपी आहेत़ यातील उपजिल्हाधिकारी कच्छवे व तहसीलदार रुईकर यांना निलंबित करण्यात आले होते़ ते आता शासकीय सेवेत परतले आहेत़ इतर आरोपींबाबतचा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे अहवाल सादर करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनही या अधिकाºयांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे़ शिवाय पोलीसही या आरोपींना अटक करीत नाहीत़