शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : साई पादुका मिरवणूक आज परभणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:50 IST

श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पाथरी रोड येथील रामभाऊ रेंगे यांच्याकडे आरती व महाप्रसाद होईल. या ठिकाणाहून दिंडीचे प्रस्थान होणार असून सकाळी ८.३० वाजता जिजाऊनगरातील अ‍ॅड.राजकुमार भांबरे यांच्या निवासस्थानी आरती, ९.३० वाजता त्रिमूर्तीनगरातील साई मंदिर, १० वाजता सिंचननगरातील गणपती मोरे, दुपारी १२.३० वाजता सरस्वतीनगर येथील श्री साई मंदिर येथे आरती व महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर विविध ठिकाणी आरती व महाप्रसाद होणार असून सायंकाळी ७.३० वाजता रथ मिरवणूक गुजरी बाजारातील राजाराम मंगल कार्यालयात पोहोचणार आहे. यावेळी डॉ.टाकळकर यांच्या हस्ते आरती होईल. त्यानंतर गुजरी बाजार व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता राजाराम मंगल कार्यालयात आरती होणार असून साई पादुका शहरातील विविध भागात दाखल होतील. सकाळी ९ वाजता प्रल्हादराव कानडे, ९.३० वाजता नीलेश झरकर, १० वाजता गोविंदराव डहाळे, १०.३० वाजता संकेत शहाणे, सकाळी ११ वाजता गांधी पार्कातील बालासाहेब घिके यांच्याकडे आरती, महाप्रसाद होईल. ११.३० वाजता माळी गल्लीत श्री साई मंदिरात आरती होणार आहे. त्यानंतर देशमुख गल्ली, कारेगावरोड, शिवाजीनगर, वसमतरोडमार्गे मिरवणूक वैभवनगरातील एन.व्ही. अनंतवार यांच्या घरी पोहोचेल. त्या ठिकाणी मुक्काम होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी वैभवनगरात दीपक तलरेजा यांच्याकडे आरती त्यानंतर कारेगावरोडमार्गे गजानननगर, श्री साई मंदिर उघडा महादेव, येलदरकर कॉलनी मार्गाने पोस्ट कॉलनीतील साई मंदिरात ही साई पादुका व रथयात्रा पोहोचेल.३० नोव्हेंबर रोजी जुना पेडगाव रोड, सहकारनगर इ. मार्गांनी ही रथयात्रा जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsaibabaसाईबाबा