शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

परभणी : आरोग्य संस्थांमधील सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:45 IST

जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची संख्या अपुरी असल्याने त्यांची सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची संख्या अपुरी असल्याने त्यांची सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यामध्ये परभणी शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर सेलू व गंगाखेड येथे उपजिल्हा रुग्णालय तर पूर्णा, पालम, पाथरी, बोरी, जिंतूर व मानवत येथे ग्रामीण रुग्णालय रुग्णांना सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. या रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. काही रुग्ण तेथेच दाखल होतात. उपचारासाठी आलेल्या व दाखल झालेल्या रुग्णांच्या आरोग्य सेवेबरोबरच सुरक्षाही महत्त्वाची आहे; परंतु, जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता, अपुºया सीसीटीव्ही कॅमेºयावरच रुग्णांची व नातेवाईकांची आणि येथे काम करणाºया कर्मचाºयांची सुरक्षा असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात ११ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तर स्त्री रुग्णालयात १२ व आॅर्थो विभागाची सुरक्षा केवळ ८ सीसीटीव्ही कॅमेºयावर अवलंबून आहे. त्याच बरोबर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात ९, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात ८, बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात ४, जिंतूर ग्रामीण रुग्णालयात केवळ ८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची संख्या अपुरी असल्याने अनेक वेळा रुग्णांचे व नातेवाईकांचे मोबाईल्स व पैसे चोरी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याचा अद्याप तपासही लागला नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर आरोग्य संस्थांनी औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे सीसीटीव्ही कॅमेरे मिळावेत किंवा त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे; परंतु, अद्यापपर्यंत या रुग्णालयांना मागणी केलेले सीसीटीव्ही कॅमेरे मिळालेले नाहीत. त्यामुळे ६० सीसीटीव्ही कॅमेºयांवर एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व सहा ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षेची भिस्त अवलंबून आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाने व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे मिळावेत, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.१७६ सीसीटीव्ही कॅमेºयांची गरजजिल्हा सामान्य रुग्णालयात तीन विभागाला ३१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे अपुरे असल्याने या रुग्णालय प्रशासनाने वरिष्ठस्तरावर अजून ५३ सीसीटीव्ही कॅमेºयांची मागणी केली आहे. यामध्ये सामान्य रुग्णालयाला ३९, स्त्री रुग्णालयाला ६ तर आर्थो विभागाला ८ सीसीटीव्ही कॅमेºयांची आवश्यकता आहे. त्याच बरोबर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाने १०, गंगाखेड १०, जिंतूर ग्रामीण रुग्णालयाने १२ सीसीटीव्ही कॅमेºयांची मागणी केली आहे. तर चार ग्रामीण रुग्णालयांनी ३८ असे एकूण १७६ सीसीटीव्ही कॅमेºयांची मागणी वरिष्ठस्तरावर नोंदविली आहे.चार ग्रामीण रुग्णालय कॅमेºयाविनाजिल्ह्यातील पूर्णा, पालम, पाथरी व मानवत या चार ग्रामीण रुग्णालयात अद्यापपर्यंत एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे या रुग्णालयात येणाºया रुग्ण व नातेवाईकांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येते. पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयाने वरिष्ठस्तरावरुन १२ सीसीटीव्ही कॅमेºयांची मागणी केली आहे; परंतु, या मागणीला वरिष्ठ कार्यालयाने अद्यापपर्यंत प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. त्याच बरोबर पालम ग्रामीण रुग्णालयामध्ये १४, पाथरी ग्रामीण रुग्णालयाने ६ तर मानवत रुग्णालयातून ६ सीसीटीव्ही कॅमेºयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयांना सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नसल्याने या चार ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरक्षाविनाच सुरु असल्याचे दिसून येत आहे.७० लाखांचा निधी तांत्रिकतेमुळे गेला परतजिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालय, सामान्य रुग्णालय व अस्थीव्यंग विभागातील रुग्णांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन विकास निधीमधून २०१६-१७ या वर्षात ७० लाख रुपयांचा निधी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आला होता; परंतु, त्यानंतर निर्माण झालेल्या तांत्रिक कारणांमुळे हा ७० लाख रुपयांचा निधी परत गेला. त्यामुळे या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी निधी मिळत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीcctvसीसीटीव्हीhospitalहॉस्पिटल