शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६८२ कोटी रुपये खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:40 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर २३ जानेवारीपर्यंत ६८२ कोटी २९ लाख रुपय वर्ग करण्यात आले आहेत़

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर २३ जानेवारीपर्यंत ६८२ कोटी २९ लाख रुपय वर्ग करण्यात आले आहेत़राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती़ त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले़ परंतु, शासनाच्या अनेक निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़ शासनाच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवर पुर्वी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची ग्रीन लिस्ट टाकण्यात येत होती़ परंतु, नंतर तीही बंद करण्यात आली़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांच्या नजरा ग्रीन लिस्टकडे लागल्या होत्या़ या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यातील शेतकरी अडचला होता़त्यानंतर शासनाकडून जिल्हा बँक, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना पात्र लाभार्थी शेतकºयांच्या ग्रीन लिस्ट याद्या प्राप्त झाल्या़ त्यानुसार २३ जानेवारपर्र्यंत जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर ६८२ कोटी २९ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत़ उर्वरित शेतकºयांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे़यासाठीची काही रक्कम जिल्ह्याला मिळालेली आहे़ शेतकºयांच्या कर्ज खात्याच्या माहितीतील त्रुटी तसेच अर्जांमध्ये असलेल्या अपुºया माहितीमुळे कर्जखात्यात रक्कम वर्ग करण्यास बँकांना अडचणी येत आहेत़ त्यामुळे या अडचणी दूर करून येत्या काही दिवसांत उर्वरित शेतकºयांच्या खात्यावर कर्जमार्फीची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून ‘लोकमत’ला देण्यात आली़एसबीआयकडे : ४४१ कोटींची रक्कम वर्गजिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४२४ शेतकºयांच्या बँक खात्यावर शासनाने ६८२ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने २९ हजार ८१४ शेतकºयांच्या खात्यावर ४५ कोटी २७ लाख, इलाहाबाद बँकेने २ हजार ५ शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी २७ लाख, आंध्रा बँकेने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ६० लाख, अ‍ॅक्सीस बँकेने १ शेतकºयाच्या खात्यावर १४ हजार, बँक आॅफ बडोदा बँकेने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी १ लाख, बँक आॅफ इंडियाने १० शेतकºयांच्यावर २ लाख ५० हजार, बँक आॅफ महाराष्ट्राने ६ हजार १९९ शेतकºयांच्या खात्यावर ४४ कोटी १९ लाख १९ हजार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १७ हजार ७०३ शेतकºयांच्या नावे १०४ कोटी ६७ लाख, स्टेट बँक आॅफ इंडियाने ६४ हजार ६७२ शेतकºयांच्या नावे ४४१ कोटी १२ लाख अशी कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे़शेतकºयांना मिळेना माहितीराज्य शासनाने प्रत्येक शेतकºयाची दीड लाखांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १९४ शेतकºयांसाठी ६९६ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली़ त्यातील ९९ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्गही करण्यात आली़ परंतु, बहुतांश शेतकºयांना आपले कर्जमाफ झाले की नाही, याची माहिती मिळेनाशी झाली आहे़ त्यामुळे कर्जमाफ होवूनही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी संभ्रमात आहेत़