शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

परभणी : लोकप्रतिनिधींच्या कामांसाठी झाले १० कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:18 IST

भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ९ कोटी ९२ लाख ५० हजार रुपयांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली असून, त्यातील ४ कोटी ७० लाख जिल्ह्याला वितरित करण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ९ कोटी ९२ लाख ५० हजार रुपयांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली असून, त्यातील ४ कोटी ७० लाख जिल्ह्याला वितरित करण्यात आले आहेत़जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती/गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकरीता आमदार व खासदार या लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मंजुरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ त्या अनुषंगाने राज्याच्या सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १६ आॅगस्ट रोजी आदेश काढला आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील कामांसाठी ९ कोटी ९२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील ४ कोटी ७० लाख पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आले आहेत़ वितरित करण्यात आलेल्या निधीसोबत कामांचा तपशील देण्यात आला आहे़ त्यानुसार जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे सीसी नाली बांधकाम, नाला व पूल बांधकाम, वस्सा येथे सुशोभीकरण, खडका येथे सौर पथदिवे, सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी, भिसेगाव, थडी उक्कडगाव, उखळी स्टेशन येथे सिमेंट रस्ते व नाली, परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील कृषीनगर येथे डांबरीकरण, मांडवा येथे सीसी रस्ता व नाली बांधकाम, ब्राह्मणगाव येथे रस्ता मजबुतीकरण, रामपुरी येथे बुद्धविहारास संरक्षण भिंत, मिर्झापूर येथे दलित वस्ती अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम, मुरूंबा येथे दलित वस्ती अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम, तट्टू जवळा, पिंगळी, कोथाळा, मांगणगाव येथे सीसी रस्ता व नाली बांधकाम, पाथरी तालुक्यातील उमरा येथे हायमास्ट दिवे बसविणे, जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, पाचलेगाव, सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, खरदडी येथे हायमास्ट दिवे, चिंचोली दराडे, कौडगाव बु़ येथे बंदिस्ती नाली बांधकाम, माथला, लिंबाळा, चिंचोली घुटे, चामणी येथे नाली बांधकाम, गणेश नगर अंतर्गत भिलज येथे हायमास्ट दिवे, वडी, धानोरा येथे सीसी रस्ता तयार करणे, इटोली येथे संरक्षण भिंत बांधणे, सेलू तालुक्यातील डिग्रस खुर्द, शिराळा, चिमणगाव, धनेगाव, गुगळी धामणगाव येथे सभामंडप बांधकाम, तिडी पिंपळगाव येथे वार्ड क्रमांक १, २ येथे सोलार पथदिवे बसविणे, सोनपेठमधील प्रभाग क्रमांक १ मध्ये नाली बांधकाम, परभणी तालुक्यातील कारेगाव येथे पथदिवे, सीसी नाला, सीसी रस्ता तयार करणे, कावलगाव येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, बरबडी येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, सारंगी (मिटापूर) येथे विद्युत दिवे व एलईडी बसविणे, पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर, पिंपळगाव गायके, गंगाखेड तालुक्याती वरवंटी, पडेगाव, पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर, कावलगाव येथे नाली बांधकाम व विद्युतीकरण, परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे सीसी रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविणे, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, पूर्णा तालुक्यातील सुहागण येथे सीसी रस्ते, नाली बांधकाम करणे, माटेगाव येथे एलईडी दिवे बसविणे, फुलकळस येथे पेव्हर ब्लॉक, नालीबांधकाम, मानवत तालुक्यातील मंगरुळ, निपाणी टाकळी येथे स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे, आंबे टाकळी, कोटंबवाडी येथे एलईडी दिवे बसविणे, पोखर्णी नृसिंह येथे स्मशानभूमीस संरक्षण भिंत व इतर सुविधा देणे, पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठे नगर, पिंपळगाव लिखा, पिंपळगाव बाळापूर, बरबडी, जिंतूर तालुक्यातील डिग्रस, उमरद, धोपटवाडी येथे सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे़विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मिळाला निधी४विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे़ या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना तयारी करता यावी, या अनुषंगाने राज्य शासनाने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती आणि गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे़ निश्चितच मतांवर डोळा ठेवून देण्यात आलेला हा निधी संबंधित लोकप्रतिनिधींना कितपत उपयुक्त ठरेल, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांती स्पष्ट होणार आहे़ असे असले तरी लोकप्रतिनिधींना मात्र यानिमित्ताने जनतेसमोर निधी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीState Governmentराज्य सरकार