शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६ वर्षांपासून रखडला पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:43 IST

शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.सोनपेठ येथून नाथरा मार्गे अंबाजोगाईला जोडणाºया सोनपेठ शहरातील वाण नदीवर २०१३ मध्ये पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र या पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. ते काम पूर्ण करण्यासाठी २ वर्षाची मुदत देण्यात आली होती. तरीही संबंधित काम अर्धवट अवस्थेत आहे. परिसरातील नागरिकांना अर्धवट कामामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सोनपेठ- नाथरा- अंबाजोगाई हा मार्ग पूर्ण झाल्यास गवळी पिंपरी, खपाट पिंपरी, निमगाव, डिघोळ व नाथरा येथील नागरिकांना सोनपेठ ते अंबाजोगाई हे अंतर १० कि.मी. ने कमी होणार आहे. तसेच शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास या शेतकºयांंना शेतात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे हा पूल पूर्ण झाल्यास व त्यापुढील रस्त्याचे काम झाल्यास तालुक्यातील नागरिकांचा अंबाजोगाईला जाण्यासाठी पैसा व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या रखडलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, पुलाच्या कामासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. बांधकामाला दोन वर्र्षाची मुदतही मिळाली; परंतु, अधिकाºयांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे या पुलाचे काम रखडले आहे.या पुलाच्या कामाला २०१३ मध्ये सुरूवात झाली; परंतु, निधीच्या कमतरतेमुळे हे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल.-संजय बंडे,उपविभागीय शाखा अभियंता, सोनपेठ

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीroad transportरस्ते वाहतूक