शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:19 IST

शहरातील विविध भागांतून चोरीला गेलेल्या सहा दुचाकी २२ जानेवारी रोजी पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

परभणी : शहरातील विविध भागांतून चोरीला गेलेल्या सहा दुचाकी २२ जानेवारी रोजी पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

चालू वर्षात नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वीही शहरातील इतर भागात आणि जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. हे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्या संदर्भात माहिती घेत असताना चोरीची दुचाकी घेऊन दोघेजण सेलूहून सातोना रस्त्याने जात असल्याची माहिती २१ जानेवारी रोजी पोलिसांना मिळाली. 

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सातोना रस्त्यावर सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. या आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे. तर दुसर्‍या आरोपीने त्याचे नाव हरिष मखमले (२५) असे सांगितले. दोघेही जालना जिल्ह्यातील सातोना येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी आरोपींकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशीनंतर ही दुचाकी विष्णू आकात (रा.सातोना) याच्या मदतीने परभणी येथून चोरुन आणल्याचे सांगितले. तसेच परभणीत इतर चार दुचाकी चोरल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली. यापैकी एक दुचाकी सेलू-सातोना रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ आणि उर्वरित तीन दुचाकी सेलू येथील अजय गोरखनाथ भिसे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत आल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दुचाकी ताब्यात घेतल्या. या दुचाकी नानलपेठ भागातून चोरीला गेल्याचे स्पष्ट  झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे, पोलीस कर्मचारी मधुकर पवार, शिवाजी धुळगुंडे, शरद मुलगीर, शाम काळे, संजय शेळके, किशोर चव्हाण, कांबळे, गणेश कौटकर, राजेश आगाशे आदींनी केली. 

परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्या होत्या. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच विद्यानगर भागातून एक बुलेट चोरट्यांनी पळविली होती. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत बुलेटसह पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पकडले असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :theftचोरीparabhaniपरभणी