शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुसऱ्याच दिवशी पावसाने घेतली विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:48 IST

शनिवारी पहाटे मान्सूनच्या पावसाने आगमन झाल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवारी पहाटे मान्सूनच्या पावसाने आगमन झाल्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत़जिल्ह्यात १५ ते २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत होते़ मान्सूनचा पाऊस जास्त होत नसल्याने पेरण्या कराव्यात की नाही? अशी द्विधा मन:स्थिती झाली होती़ पेरण्यांसाठी यावर्षी मे महिन्यापासून शेतकºयांनी तयारी करून ठेवली़ शेत जमिनी नांगरून आणि पाळ्या घालून पेरणीसाठी सज्ज केल्या होत्या़ पाऊस झाल्यानंतर थेट पेरण्यांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती़ त्यासाठी मान्सूनच्या मोठ्या पावसाची शेतकºयांना प्रतीक्षा लागली़ अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी पहाटे जिल्हाभरात मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला़ या पावसाळ्यातील पहिल्याच पावसाने वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे़ शेतकºयांनीही पेरण्यांसाठी लगबग सुरू केली़ शनिवारी दिवसभर मोंढा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती़ रविवारी देखील पाऊस होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती़ मात्र पावसाने चक्क विश्रांती घेतली़ सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले़ मात्र कोठेही पाऊस बरसला नाही़ त्यामुळे पुन्हा एकदा पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना लागली आहे़दरम्यान, शनिवारी रात्री जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे़ सरासरी २़४२ मिमी पाऊस झाला आहे़ पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ७़२० मिमी पावसाची नोंद झाली असून, परभणी १़५०, पालम ३ मिमी, गंगाखेड १़२५ मिमी, सोनपेठ २ मिमी, पाथरी १ मिमी, जिंतूर २़८३ मिमी आणि मानवत तालुक्यात ३ मिमी पाऊस झाला़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी असून, आतापर्यंत जिल्ह्यात ३४़३३ मिमी पाऊस झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस