शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:रिपब्लिकन सेनेचा धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:41 IST

जायकवाडी कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांना माता रमाई व पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी झोपडपट्टीधारक लाभार्थ्यांनी ८ जानेवारी रोजी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांना माता रमाई व पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी झोपडपट्टीधारक लाभार्थ्यांनी ८ जानेवारी रोजी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील गुलशनाबाग परिसरातून शेकडो लाभधारक सुपरमार्केटमार्गे जायकवाडीतील कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयापर्यंत पोहचले. महिला-पुरुष मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.१९९५ पूर्वीच्या झोपड्या नियमित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशाची राज्यभरात अंमलबजावणी होत असताना परभणी जिल्ह्यात मात्र पायमल्ली होत आहे. नांदेड जिल्ह्यात कॅनॉलच्या बाजुने असलेली अतिरिक्त जागा महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे कॅनॉलच्या परिसरात असलेल्या झोपडपट्टीधारकांचा प्रश्न सुटला आहे.परभणी शहरात जायकवाडीच्या कॅनॉल परिसरात झोपडपट्टीधारकांना जायकवाडी विभागाकडून नाहकरत प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी हे लाभार्थी माता रमाई व पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. तेव्हा सर्व लाभार्थ्यांंना नाहकरत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनात चंद्रकांत लहाने, सिद्धार्थ कसारे, अरुण लहाने, किरण घोंगडे, निलेश डुमणे, रमेश भिंगारे, सचिन खरात, तुषार कांबळे, माधव वानखेडे, अशिष वाकोडे, मिलिंद हजारे, संजय खिल्लारे, राहुल कांबळे, कपील गवळी, महेंद्र गाडेकर, सरुबाई जमदाडे, रेणुकाबाई झोडपे, चतुराबाई ठोके आदींसह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. तीन तास हे आंदोलन चालले.