शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अडचणी दूर झाल्याने पूर्णेकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:15 IST

शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़पूर्णा येथील बंधाºयातील पाणीसाठा संपल्याने शहरात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर बंधाºयातून १ दलघमी पाण्याची मागणी नगरपालिकेने केली़ त्यास मंजुरीही मिळाली होती़ नियोजनानुसार रविवारी सकाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी सोडले जाणार होते़ परंतु, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती़ या पार्श्वभूमीवर खा़ बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकाºयांशी संपर्क साधून नियोजनानुसार पाणी सोडण्याचे सूचित केले़ त्यानंतर सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, पाणी सोडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे़पूर्णा शहरासाठी पालिका प्रशासनाने १ दलघमी पाणीसाठा देण्याची मागणी केली होती़ मात्र या मागणीनुसार पाणी सोडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने रविवारी रात्री किंवा सोमवारी पहाटे जलाशयातून पाणी सोडले जाईल, अशी माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतो संतोष बिराजदार यांनी दिली़पूर्णा येथील कोल्हापुरी बंधाºयात आलेले पाणी शहराला अडीच ते तीन महिन्यांपर्यंत पुरते़ बंधाºयातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी दुरुस्ती करण्याची गरज आहे़ तेव्हा बंधाºयाची दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी होत आहे़टंचाई भासू देणार नाही : बशीर४उन्हाळ्यात पूर्णा शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे़४नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी पालिकेने योग्य ते नियोजन केले असून, टंचाई निवारण करण्यासाठी उपाययोजनाही राबविल्या जात आहेत़४त्यामुळे पूर्णा शहरामध्ये पाणीटंचाई भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा सभापती शेख मन्नानबी शेख बशीर यांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई