शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नव्या ठाण्याचा प्रस्ताव अपुर्णतेमुळे केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एम.आय.डी.सी. भागात नवीन पोलीस ठाण्यासाठी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने तो परत करण्यात आला आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.मागील काही वर्षांमध्ये परभणी शहराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहराचा विस्तारही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एम.आय.डी.सी. भागात नवीन पोलीस ठाण्यासाठी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने तो परत करण्यात आला आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.मागील काही वर्षांमध्ये परभणी शहराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहराचा विस्तारही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे असले तरी पोलीस ठाणे आणि कर्मचाऱ्यांची संख्या मात्र ३० वर्षांपूर्वी जी होती तेवढीच आहे. शहराचा विस्तार वाढत चालल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी- कर्मचाºयांवर ताण वाढत आहे. पोलीस प्रशासनातील कामकाजात सुसूत्रता यावी, या उद्देशाने शहरात आणखी एक पोलीस ठाणे स्थापन करण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेऊन एम.आय.डी.सी. परिसरात नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. जिल्हा पोलीस दलाने काही महिन्यांपूर्वीच नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. मात्र या प्रस्तावात अनेक त्रुटी आढळून आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाने या प्रकरणी पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे कळविण्यात आले आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पोलीस ठाणे निर्मितीच्या हालचालीला गती येणार आहे.तीन पोलीस : ठाण्यांची विभागणीपरभणी शहरातील एम.आय.डी.सी. परिसरात नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यासाठी तीन पोलीस ठाण्यांमधील भागाचे विभाजन केले जाणार आहे. त्यात नवा मोंढा पोलीस ठाणे, ताडकळस पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचा समावेश आहे. या तिन्ही पोलीस ठाण्यांतील काही भाग कमी करुन तो एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्यातील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.भागनिहाय प्रस्तावाची आवश्यकताजिल्हा पोलीस प्रशासनाने नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव सादर करताना कोणत्या पोलीस ठाण्यातील कोणता भाग नवीन पोलीस ठाण्यात समाविष्ट करावयाचा आहे, याविषयीचा सविस्तर प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर गृह विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून समाविष्ट होणाºया भागातील नागरिकांकडून हरकती, दावे मागविले जातील. त्यानंतरच हा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परिपूर्ण प्रस्तावाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPolice Stationपोलीस ठाणेMIDCएमआयडीसी