शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

परभणी:श्रीरामांच्या जयघोषात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:21 IST

राम जन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवारी परभणी शहरातून श्रीरामांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील सजीव देखावे, ढोल पथक, लेझीम पथक, बॅन्ड पथकासह ५० फुटाच्या तिरंगा ध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राम जन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवारी परभणी शहरातून श्रीरामांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील सजीव देखावे, ढोल पथक, लेझीम पथक, बॅन्ड पथकासह ५० फुटाच्या तिरंगा ध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधले.शनिवारी जिल्हाभरात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच रामनवमीची ठिकठिकाणी तयारी करण्यात आली होती. परभणी शहरातील जागृती नगर भागातील राम मंदिर, प्रल्हाद राम मंदिर, गांधी पार्कातील राजाराम सभागृह यासह इतर मंदिरांमध्येही दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आरती, गुलालांची उधळण करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गावरुन श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अश्व, फेटाधारी महिला, बुलेटस्वार महिला, वासुदेव, गोंधळी, मुलींचे लेझीम पथक, सोलापूर येथील हालगी पथक, नाशिक येथील स्वरसंगम बॅन्ड, पुणे येथील ढोल पथक, तांडव ग्रुपचा सजीव देखावा यासह ५० फुटांचा तिरंगी ध्वज हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेली ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्टेशनरोड, विसावा कॉर्नर, नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठमार्गे शनिवार बाजारपर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी महाआरतीने मिरवणुकीची सांगता झाली.परभणीत शहरात ठिकठिकाणी स्वागत४मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. ढोल-ताशांचा गजर आणि जय श्रीरामचा जयघोष करीत ही मिरवणूक मुख्य मार्गाने जात होती. या मार्गाच्या दोन्ही बाजुला मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ठिक ठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.पूर्णेत श्रीराम जन्मोत्सव४पूर्णा- शहर व परिसरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने जागृत हनुमान मंदिर आनंदनगर येथून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेला देखवा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. जय श्रीरामच्या जयघोषणाने शहर दुमदुमून गेले. आनंदनगर, महावीरनगर, संत नरहरी महाराज चौक येथे थंडपेय वाटप करण्यात आले. प्रमुख मार्गावर रांगोळी काढली होती. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. बसवेश्वर चौक, शिवाजी चौक, सराफा बाजार, महादेव मंदिर, गुरुबुद्धी स्वामी मठमार्गे निघालेल्या या शोभायात्रेची श्रीराम मंदिर भागात सांगता झाली. दुपारी राम मंदिर येथे जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मयूर दायमा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मारवाडी समाजबांधव व मंदिर संयोजन समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.मानवतमध्ये शोभायात्रा४मानवत- रामनवमीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने श्रीराम यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राम, सीता, हनुमानाचे सजीव देखावे सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेपासून सायंकाळी ६ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. पाथरीनाका, पोलीस ठाणे, कापड मार्केट, भाजी मंडई, कडतन गल्ली, कुºहाडे गल्ली, मंत्री गल्लीमार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर मोठा मारोती मंदिर येथे महाआरती करण्यात आली. या मिरवणुकीत बालक, युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेपासून लाड गल्लीतील राममंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीRam Navamiराम नवमी