शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलिसांनी जप्त केला ७८ लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:05 IST

जिंतूर तालुक्यात ब्रेकर, जेसीबी मशीन चोरी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यात ब्रेकर, जेसीबी मशीन चोरी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़जिंतूर येथील गजानन घुगे यांच्या फिर्यादीनुसार ४ मे रोजी २ लाख रुपये किंमतीचे जेसीबी यंत्र व टेलकॉम कंपनीचे ब्रेकर चोरून नेल्याची तक्रार जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती़ त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला़या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सायबर सेलच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज एकत्र केले, त्यात हे ब्रेकर पोकलॅन मशीन व ट्रेलर्सच्या सहाय्याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले़ सायबर सेलच्या मदतीने फुटेज व वाहनांच्या क्रमांकाची माहिती घेतली़ तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर अमर अजित बोरकर (रा़ चौंडेश्वर वाडी ता़ माळसिरस) या आरोपीस सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले तर याच प्रकरणातील नवनाथ बाबूराव शेळके (रा़ नांदगाव ता़ चाकूर) यास त्याच्या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले़ आरोपी अमर बोरकर याने त्याचे वडील अजित बोरकर व नवनाथ शेळके यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले़या गुन्ह्यात २ लाख रुपयांचे ब्रेकर, गुन्हा करण्यासाठी वापरलेले ५० लाख रुपये किंमतीचे पोकलॅन मशीन, २० लाख रुपयांचे ट्रेलर आणि ६ लाख रुपयांची हुंडाई कार असा ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ आरोपींना जिंतूर पोलीस ठाण्यात हजर केल्याची माहिती स्थागुशाने दिली़ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, गणेश कौटकर, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे, राजेश आगासे यांनी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी