शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मटका बुकीवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:17 IST

तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या मटक्याच्या बुकीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या मटक्याच्या बुकीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.परभणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मटक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध भागात सर्रासपणे मटका सुरु असताना पोलिसांकडून मुख्य बुकीवर कारवाई होण्याऐवजी पंटरवरच कारवाई केली जात आहे. शिवाय या कारवाईत फारसा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. आठवडाभरापूर्वी परभणी शहरात सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने दोन ठिकाणी केलेल्या कारवाई मटका खेळणाऱ्या दोघांकडून एकूण १२० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर २० डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने परभणी तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकाजवळ सापळा रचून मटकाचालकांवर छापा टाकला. त्यात लिंबाजी पांडुरंग पवार, राजू पिराजी कटारे व बबन शामराव आळसे हे पळून जात असताना त्यांना पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले व त्यांची चौकशी केली असता ते लोकांना जमवून त्यांच्याकडून पैसे घेऊन मुंबई नावाचा मटका जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांच्याकडून १३ हजार ६९३ रुपये व मटका जुगाराचे साहित्य, दोन मोबाईल असा एकूण १५ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी लक्ष घालून मुख्य बुकींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस