शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आडगाव फाटा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:27 IST

जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोेलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यावरुन पथक तयार करुन मोरे यांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आडगाव फाटा येथील शेषराव कुटे यांच्या आखाड्यावर धाड टाकली. यावेळी पत्यावर पैसे लावून विना परवाना बेकायदेशीररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना २१ जण आढळून आले. त्यांच्याकडून ३९ हजार १६० रुपये, मोबाईल, मोटारसायकल, कार व जुगाराचे साहित्य असा ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी वैजनाथ धोंडीबा मगर (दौंडगाव), प्रभाकर विठ्ठलराव दाभाडे (रा.आडगाव), मधुकर भीमराव कदम (बोर्डी), बाबाराव साहेबराव नागरे (भगवा), गणेश साहेबराव कदम (जिंतूर), सचिन फकीरराव इंगोले (लाडाळा), माणिक तुळशीराम मस्के (रेपा), सर्जेराव दत्तराव पालवे (रा.मिर्झापूर), दत्तराव आबासाहेब डोंबे (रा.उंडेगाव), अरुण पांडुरंग मुटकळे (रा.वस्सा), दत्ता मुंजाजी दराडे (रा.चिंचोली), सुदाम तातेराव कुटे (रा.वस्सा), जनार्दन रुस्तुम, विजय विश्वनाथ खिल्लारे (दोघे रा.गडदगव्हाण), विष्णू अप्पाराव कुटे (रा.दौंडगाव), मारोती विलासराव येळणे, तातेराव खंडुजी डाखोरे, गजानन दत्तात्रय लाकाडे (सर्व रा.रामेश्वर), प्रकाश झुजाजी दराडे (रा.लिंबाळा), शेषराव माधवराव कुटे, विजयराव देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, पोह.सुग्रीव केंद्रे, लक्ष्मण धूतराज, निलेश भूजबळ, छगन सोनवणे, संजय घुगे आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी