शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:25 IST

राज्यातील एकूण २० श्वान प्रशिक्षणासाठी आले होते. त्यातून बोल्टने प्रथम क्रमांक मिळविला.

- राजन मंगरुळकरपरभणी : पोलीस दलातील श्वान पथकात बॉम्ब शोधक व नाशक दलामध्ये दाखल झालेल्या बोल्ट या श्वानाने पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. या प्रशिक्षणात घेण्यात आलेल्या परीक्षेत स्फोटक पदार्थ शोधण्याच्या प्रक्रियेत त्याने राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे बोल्टच्या कामगिरीने जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.

पोलिसांना गंभीर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी श्वान पथक कार्यरत असते. बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये सध्या एकूण सहा श्वान आहेत. यातील लेब्राडॉग जातीचे बोल्ट नावाचे श्वान जिल्हा पोलीस दलात मागील वर्षी दाखल झाले. सहा महिन्यांचे बोल्ट श्वान हे २० डिसेंबर ते २२ जून या कालावधीत पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाला गेले होते. तेथे स्फोटक पदार्थ ओळखणे, संशयित वस्तूंची तपासणी, विविध प्रकारचे ज्वलनशील आणि स्फोटक कसे निकामी करायचे, याशिवाय वेगवेगळे सर्च ऑपरेशन राबविताना श्वानाने करावयाची कामे याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले. प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात त्याची परीक्षाही घेण्यात आली. यात सुध्दा त्याने चुणूक दाखविली. राज्यातील एकूण २० श्वान या कालावधीत प्रशिक्षणासाठी आले होते. त्यातून बोल्टने प्रथम क्रमांक मिळविला.

अवघे एक वर्ष वयमानपोलीस दलात श्वान बोल्ट दाखल झाले तेव्हा त्याचे वय केवळ सहा महिने होते. यानंतर सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून आता ते पोलीस दलात पुढील तपास आणि विविध कामांसाठी सज्ज झाले आहे. साधारण पुढील दहा वर्ष हे श्वान पोलीस दलात कार्यरत राहू शकते.

पथकाकडे केले सुपूर्द...प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर श्वान बोल्ट याचे स्वागत करुन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एम.तोटेवाड, डॉग हँडलर साहेब तोटेवाड, सीता वाघमारे, इमरान शेख यांच्याकडे सुपूर्द केले. आता श्वानाची मदत परभणीच्या पोलिसांना वेगवेगळ्या कामासाठी आगामी काळात होणार आहे. या प्रशिक्षणासाठी श्वानासोबत डॉग हँडलर साहेब तोटेवाड, सीता वाघमारे यांनीही सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूणे येथील डीवायएसपी यादव तुमरेड्डी,  पोलीस निरीक्षक संजय नेरकर, राजेश चव्हाण, उदय कळसे, सुप्रिया केंद्रे यांनी श्वानाला दिले.

टॅग्स :parabhaniपरभणीdogकुत्रा