शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:06 IST

परभणी शहरासह तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका आणि जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून ९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ या दोन्ही प्रकरणात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरासह तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका आणि जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून ९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ या दोन्ही प्रकरणात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़परभणी जिल्ह्यात मटका, जुगार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी याविरूद्ध कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागांत छापे टाकले जात आहेत़ शहरातील नानलपेठ आणि नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवाया करण्यात आल्या़ त्यात आरोपी युनूस खान बिस्मिल्ला खान (रा़ गुलशना बाग), अकबर खान (रा़ गाडी मोहल्ला) व सय्यद अजहर सय्यद खलील (रा़ मकदूमपुरा) हे लोकांना पैशांचे आमिष दाखवू मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या देऊन जुगार चालवित असताना पोलिसांना आढळून आले़ अशोक नगर आणि जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीलगत हा जुगार चालविला जात होता़ त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत रोख ३ हजार १६० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले़ या प्रकरणी नानलपेठ व नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे़त्याचप्रमाणे दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जांब शिवारात बाबासाहेब रेंगे यांच्या शेत आखाड्यावर हारजीत, तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला़या छाप्यात रोख ९०० रुपये, ५ मोटारसायकल असा १ लाख ६५ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला़ या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे़ ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद बिपट, मधुकर चट्टे, हनुमान जक्केवार, बाळासाहेब तुपसुंदरे, शरद मुलगीर, भगवान भुसारे, विशाल वाघमारे, अनिल कोनगुलवार यांच्या पथकाने केली़सलग दुसºया दिवशीही कारवाई४जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातही मटका जुगार खुलेआम सुरू असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. १५ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलीस ठाणे, पूर्णा येथे कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी