शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : क्षुल्लक कारणावरून महिलेस पाजले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:59 IST

पाण्याचा बोअर व फ्लॅट आम्हाला वापरायला का देत नाही, असे म्हणत एका महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : पाण्याचा बोअर व फ्लॅट आम्हाला वापरायला का देत नाही, असे म्हणत एका महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तालुक्यातील पांढरवाडी येथील अश्विनी नवनाथ बंडगर (वय २३) आणि सुग्रीव व्यंकटी बंडगर, संग्राम व्यंकटी बंडगर, व्यंकटी हरिभाऊ बनगर यांच्यात असलेला सामायिक पाण्याचा बोअर, फ्लॅट वापरला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आपसात वाद होत होते. १६ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुग्रीव बंडगर, संग्राम बंडगर, व्यंकटी बंडगर या तिघांनी अश्विनी बंडगर यांच्या घरात प्रवेश केला. यानंतर अश्विनी बंडगर, विजय बंडगर, रेणुका बंडगर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. संग्राम बंडगर व व्यंकटी बंडगर यांनी फिर्यादी अश्विनी बंडगर यांचा दीर विजय बंडगर, जाऊ रेणुका बंडगर यांना पकडून ठेवले तर सुग्रीव बंडगर याने अश्विनी बंडगर यांना पलंगावर आडवे पाडून खिशातून विषारी द्रवाची बाटली काढली.तुमच्या घरातील एखाद्या माणसाचा काटा काढल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, आता तुम्हाला दाखवतो असे म्हणत विषारी द्रवाची बाटली अश्विनी बंडगर यांच्या तोंडाला लावली. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने बाटलीतील द्रव तोंडात टाकल्याची फिर्याद १७ डिसेंबर रोजी अश्विनी बंडगर यांनी पोलीस ठाण्यात दिली.यावरुन पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजकुमार पुजारी, जमादार मारोती माहुरे हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी