शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘पीएम’चे जिंतूरमध्ये सर्वाधिक लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:09 IST

पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांना पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर त्यांची नावे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पोर्टलवरील पात्र शेतकºयांना तीन महिन्यांतून एक वेळा २ हजार रुपये या प्रमाणे लाभ दिला जात आहे.जिल्ह्यात सुमारे सव्वा तीन लाख शेतकरी असले तरी प्रत्यक्षात पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर २ लाख ९१ हजार ४७७ शेतकºयांची नावे अपलोड झाली असून, या शेतकºयांना मानधन दिले जात आहे. १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने पीएम किसान योजनेतील शेतकºयांची तालुकानिहाय संख्या जाहीर केली.मध्यंतरी आधार क्रमांकाच्या आधारावरच शेतकºयांना लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.जिल्हा प्रशासनाने पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर अपडेट असणाºया शेतकºयांची संख्या नुकतीच जाहीर केली आहे. या संख्येनुसार जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे सोनपेठ तालुक्यातील केवळ १८ हजार २४० शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत.३१ डिसेंबरपासून या शेतकºयांना आधार क्रमांकावर आधारित मानधनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतकºयांची नावे आधार क्रमांकानुसार अपडेट करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. त्यास शेतकºयांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून, निम्म्याहून अधिक शेतकºयांनी आपली नावे आधार क्रमांकानुसार अपडेट केली आहेत. त्यामुळे हे शेतकरी किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. आधार अपलोडींग शिल्लक असणाºया शेतकºयांनी आधार क्रमांक अपलोड केल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.आधार संकलनाचे काम सुरूच४पीएम किसान योजनेमध्ये आधार क्रमांक नसलेल्या शेतकºयांची संख्या सुरुवातीला ८० हजार पेक्षाही अधिक होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गावा-गावात योजनेची जनजागृती करुन शेतकºयांना त्यांचे आधार क्रमांक आणि आधार क्रमांकानुसार पीएम किसान पोर्टलवरील शेतकºयाचे नाव अपडेट करुन घेण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातूनही शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित करण्यात आले. त्याचा परिणाम निम्म्यापेक्षा अधिक शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित झाले असून, आता केवळ १२ हजार शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित करणे शिल्लक आहेत. या शेतकºयांचे आधार क्रमांक संकलनाचे काम अजूनही सुरू आहे. ज्या शेतकºयांची नावे आधारनुसार अपडेट झाली नाहीत ते शेतकरी मानधन योजनेपासून वंचित राहू शकतात. तेव्हा शेतकºयांना अजूनही संधी असून, त्यांनी आधार क्रमांक आणि आधार नुसार त्यांची नावे अपडेट करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी