शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गंगाखेड शहरात प्लॅस्टिक बंदी अद्यापही कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:34 IST

पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचे वस्तू उत्पादन तसेच वापरावर मागील वर्षी शासनाने बंदी आणली. गंगाखेड शहरात मात्र कॅरीबॅग प्लॅस्टिकची चढ्या दरात विक्री तसेच वापर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचे वस्तू उत्पादन तसेच वापरावर मागील वर्षी शासनाने बंदी आणली. गंगाखेड शहरात मात्र कॅरीबॅग प्लॅस्टिकची चढ्या दरात विक्री तसेच वापर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पर्यावरणास धोकादायक ठरत असलेल्या मायक्रो पॉलिथीनच्या कॅरीबॅग तसेच प्लॅस्टिकपासूून निर्माण करण्यात आलेली पत्रावळी, प्लेट आदी वस्तूंचे उत्पादन तसेच विक्रीवर राज्य शासनाने गतवर्षी जून २०१८ मध्ये बंदी आणली आहे. शासनाने बंदी आणल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस नगरपालिका प्रशासनाने कॅरीबॅग व प्लॅस्टिकच्या वस्तुंची विक्री करणाºया व्यापाऱ्यांच्या दुकानावर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग व प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करून दंडात्मक कार्यवाही केली. त्यानंतर मात्र नगरपालिका प्रशासनाने कार्यवाहीकडे दुर्लक्ष केल्याने प्लॅस्टिक वस्तू व कॅरीबॅगवर बंदी असताना सुद्धा शहरातील व्यापारी या बंदीच्या नावाखाली छुप्या पद्धतीने या वस्तुंची चढ्या दराने विक्री करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. कॅरीबॅग व प्लॅस्टिक वस्तुंची शहरात खुलेआम विक्री होत असल्याने बाजारपेठेतील छोटे-मोठे किराणा मालाचे व्यापारी, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, मसाला वस्तुंची विक्री करणारे बिनधास्तपणे ग्राहकांना कॅरीबॅग, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दुकानातील साहित्य देत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले. मोठ्या प्रमाणात वापरात येणाºया कॅरीबॅग, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पत्रावळी, द्रोण, ग्लासचा वापर करून या वस्तू रस्त्यावर नाल्याजवळ फेकून दिल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील लहान-मोठ्या सर्वच नाल्या प्लॅस्टिकच्या कचºयाने तुडूंब भरल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.नगरपालिका प्रशासनाकडून कारवाईला येईना वेग४दोन दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी खुद्द प्लॅस्टिकच्या वापरावरुन सेलूत संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात प्लॅस्टिक वापराविरुद्ध नगरपालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती.४ पर्यावरण मंत्र्यांनी संताप व्यक्त करूनही गंगाखेड नगरपालिका प्रशासनाकडून कॅरीबॅग व प्लॅस्टिक बंदीच्या वापरावरून ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी दिवसेंदिवस गंगाखेड शहरातील कॅरीबॅगचा वापर वाढत चालला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्ेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिका