शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी : पालम शहरासाठी ५६ कोटींची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:40 IST

पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़दरवर्षी उन्हाळ्यात पालम शहराला पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो़ या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्या तरी गोदावरी नदीतील पाणी आटल्यानंतर आणि भूजल पातळी खोल गेल्यानंतर पालम शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होत आहे़ त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे़ या योजनेसाठी ५६ कोटी ६४ लाख रुपये मंजूर झाले असून, १६ जून रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणातून या योजनेसाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून, एक-दोन आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे़पालम शहरवासियांना दरवर्षी टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते़ पालम शहर आणि परिसरात मोठा जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते़ त्यावर मात करण्यासाठी आता लोहा तालुक्यातून शहरासाठी पाणी घेतले जाणार आहे़ साधारण: १५० किमी अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे़ विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ मुंबई येथील घुले कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले असून, २४ महिन्यांच्या काळात काम पूर्ण करावयाचे आहे़ त्यामुळे दोन वर्षामध्ये पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघण्याची चिन्हे आहेत़योजनेंतर्गत होणारी कामेलोहा तालुक्यातील लिंबोटी धरणापासून ते पालम शहरातील जलकुंभापर्यंतची कामे या योजनेंतर्गत केली जाणार आहेत़ त्यात मुख्य उद्भव विहीर, पंप घर, अशुद्ध जलपम्पिंग मशिनरी, उद्धरण नलिका, जलशुद्धीकरण केंद्र आणि उंच सलोह टाक्यांची उभारणी केली जाणार आहे़ या अंतर्गत उद्भव विहिरीच्या कामाचे मार्कआऊटही कंत्राटदारास देण्यात आले आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांतच या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस़व्ही़ कायंदे यांनी दिली़ग्रीड पद्धतीने होणार कामपालमसाठी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ यात अंतर्गत जलवाहिनीचा समावेश नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले़प्रती माणसी ४० लिटर पाण्याचे केले नियोजनपालम शहराची सध्याची लोकसंख्या ९४ हजार ४८७ एवढी असून, २०३४ मध्ये ही लोकसंख्या १ लाख १७ हजार १६० एवढी होईल, अशी अपेक्षा गृहित धरून १५ वर्षांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे़ या योजनेंतर्गत प्रति माणशी प्रति दिन ४० लिटर पाणी दिले जाणार असून, दररोज या योजनेतून पालम शहराला ६़१७६ दललि पाणी मिळणार आहे़ त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर शहरवासियांची पाणीटंचाई दूर होईल़चारठाणा योजनेचे काम अंतिम टप्प्यातजिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंर्गत ४ कोटी रुपये खर्चातून पाणीपुरवठा योजना उभारली जात आहे़ ही योजनाही १५ वर्षांची असून, १२ हजार ५९२ लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ जुलै २०१८ मध्ये या योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली़ चारठाणा तलावातील बुडीत क्षेत्रातून गावासाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेच्या निविदा अंतिम झाल्या असून, लवकरच या कामाचे कार्यारंभ आदेशही दिले जाणार आहेत़ २ उद्भव विहीर, उद्धरण वाहिनी, जलकुंभ आणि अंतर्गत वितरण व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई