शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पीकविमा प्रकरणी न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:11 IST

२०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते़ मात्र विमा कंपनीच्या धोरणांमुळे शेतकºयांना विमा भरपाई मिळाली नाही़ ७ लाख ६११ शेतकºयांनी ३१ कोटी ५९ लाख रुपये विमा हप्ता भरला होता़ त्यामुळे ४ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी १४१८़०७ कोटी रुपये विमा संरक्षण देणे अपेक्षित होते़ मात्र विमा कंपनीने केवळ १४८ कोटी रुपये विमा भरपाई वाटप केली़ लिमला, बाभळगाव, आवलगाव आदी महसूल मंडळात उत्पन्नात घट झाली असतानाही शेतकºयांना विम्यापासून वंचित ठेवण्यत आले होते़ या सर्व प्रश्नांवर आंदोलनेही करण्यात आली़ त्यावेळी शासनाने विमा भरपाई देण्याचे आश्वासन दिले़ परंतु, त्याची पूर्तता मात्र केली नाही़या प्रश्नी शेतकरी संघर्ष समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून, या याचिकेत केंद्र व राज्य सरकारसह रिलायन्स पीक विमा कंपनी, भारतीय विमा प्राधिकरणाला प्रतिवादी करण्यात आले आहे़ त्यामुळे शेतकºयांना आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे़पीक विमा प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे़ या याचिकेतून वंचित शेतकºयांना पीकविमा देण्याबरोबरच राज्य शासनाच्या विमा भरपाई देण्याच्या धोरणात बदल करण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित शेतकरी आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत, असे कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, रामकिशनराव दुधाटे यांनी सांगितले़ या प्रक्रियेसाठी एम़ आऱ काळे, सदाशिवआप्पा ढेले, जयसिंगआप्पा शिंदे, सचिन दुधाटे, विठ्ठल दुधाटे, आबासाहेब पवार, आबाराव दुधाटे, वसंत जोगदंड, सुरेश दुधाटे आदींनी प्रयत्न केले़

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालयFarmerशेतकरी