शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तीन वर्षांपासून अडकली रेशीम उत्पादकांची देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:19 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळूनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळूनही शेतकरी अडचणीत सापडले आहेत.प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं यासाठी केंद्र व राज्य शासनाने २००८ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत काही वर्षे शेतमजूर, शेतकºयांना फायदा झाला. मात्र त्यानंतर ही योजना राबवणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या उदासीन भूमिकेमुळे योजनेस मरगळ आली. एखादे काम मंजूर झाले तर लालफितीच्या कारभारामुळे त्या कामाला दुसरे वर्ष उजाडत असल्याचेही पुढे आले.त्यातच राज्य शासनाने रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१७ पासून रेशीम शेतीचा समावेश केला. योजनेच्या पहिल्याच वर्षी पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील १७ शेतकºयांनी या योजनेंतर्गत कामाचे प्रस्ताव दाखल केले.तहसील कार्यालय व जिल्हा रेशीम अधिकारी यांच्यामार्फत प्रति लाभार्थ्यांना ३ लाख रुपये अनुदानही मंजूर करण्यात आले होते. लाभार्थी शेतकºयांना तुती लागवडीसाठी मजुरीची देयके मिळाली. तसेच रेशीम शेडसाठी लागणारा खर्चही मिळाला.या शेतकºयांनी रेशीम शेड बांधकाम केल्यानंतर कोसला उत्पादनही सुरु केले आहे; परंतु, शेड बांधकामाचे १७ शेतकºयांचे तीन वर्षापासून ८ लाख रुपयांची देयके अडकली आहेत. शासनाकडून कुशल देयके वेळेत दिली जात नसल्याने शेतकरी या योजनेपासून दूर जावू लागले आहेत.येथील शेतकºयांचे रेशीमसाठीचे कुशल देयके कार्यालयात सादर केले आहेत. मात्र शासनाकडून अद्याप शेतकºयांना आॅनलाईन पेमेंट उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सिंचन विहिरींची ८८ लाख रुपयांची देयके अडकलीमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेती बरोबरच सिंचन विहिरींचीही मोठ्या प्रमाणात कामे केली जातात. या कामातून गावातील मजुराला गावातच काम मिळते. त्याच बरोबर लाभार्थी शेतकºयाला सिंचनाचीही सोय उपलब्ध होते. त्यामुळे ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांचे रुपडे पालटणारी ठरत असल्याचे काही वर्षांपूर्वी वाटत होते; परंतु, लालफितीच्या कारभारामुळे या योजनेविषयी आता शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे २०१७-१८ या वर्षात सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेल्या ७२ शेतकºयांचे ८८ लाख रुपयांचे कुशल देयके गेल्या सहा महिन्यांपासून अडकली आहेत. कुशल देयके वेळेत मिळत नसल्याने लाभार्थी शेतकरी आर्थिक कोंडित सापडला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी