शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाथरी येथे दोन गटात हाणामारी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:34 IST

शहरातील एका बारवर उधार दारु देण्याच्या कारणावरुन लोखंडी गज, विटांनी जोरदार हाणामारी झाल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेतील एकास अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): शहरातील एका बारवर उधार दारु देण्याच्या कारणावरुन लोखंडी गज, विटांनी जोरदार हाणामारी झाल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेतील एकास अटक करण्यात आली आहे.पाथरी शहरातील सोनपेठ फाट्यावर मिलिंद सावंत यांचा हर्षवर्धन पेट्रोलपंप व बिअरबार आहे. या दोन्ही ठिकाणी २५ आॅक्टोबर रोजी रात्री हाणामारीची घटना घडली. या घटनेत दगडफेक होऊन काही जणांचे डोके फुटले आहे. यामध्ये हर्षवर्धन बारमध्ये घडलेल्या घटनेत उधार दारु मागण्याच्या कारणावरुन हाणामारी झाली. बारचालक गोविंद जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लक्ष्मण कांबळे, सचिन कांबळे, प्रमोद कांबळे आणि नितीन चितलांगे यांना उधार दारु न दिल्यामुळे यांनी बारमध्ये बिअरच्या बाटल्या आणि इतर साहित्याची तोडफोड करीत १५ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. त्याच बरोबर गल्ल्यातील ३५ हजार रुपये लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर हर्षवर्धन पेट्रोलपंपावर झालेल्या हाणामारीत लक्ष्मण कचरु कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बारवरील पैसे देण्या-घेण्याचे कारण काढून पेट्रोलपंपचालक मिलिंद सावंत व त्यांचा साथीदार गोविंद जैस्वाल आणि इतर दोन जणांनी लोखंडी गजाने मारहाण केली. खिशातील नगदी ५० हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार दिल्या प्रकरणी मिलिंद सावंत, जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी