शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बसचालकाच्या प्रसंगावधानाने ५७ प्रवाशांचा जीव वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:47 IST

औरंगाबादहून जिंतूर-येलदरी मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवित प्रयत्नांची पराकाष्टा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : औरंगाबादहून जिंतूर-येलदरी मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवित प्रयत्नांची पराकाष्टा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाºया सातही आगारामध्ये मोठ्या प्रमाणात नादुरुस्त बस आहेत. असे असतानाही नादुरुस्त बस लांबपल्यासाठी पाठविल्या जात आहेत. त्याचाच प्रत्यय १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास येलदरी येथील अरूंद पुलावर आला. येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाच्या धरणावर अरुंद पूल आहे. या पुलावरून औरंगाबादहून जिंंतूर -येलदरी मार्गे रिसोडकडे जाणारी एम.एच. ०६ एस.८९०८ क्रमांकाची बस सायंकाळी ६.३० सुमारास जात असताना अचानक बसचे बाटे तुटले. त्यामुळे ही बस चक्क पुलाकडे घसरत येत असतानाच बसचे चालक विजय पदमाने यांनी प्रसंगावधान राखत घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ ब्रेक लावले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली पडतापडता वाचली. त्यामुळे ५७ प्रवाशांचे जीव वाचले. या बसमध्ये रिसोड, सेनगाव, हिंगोली, वाशिम आदी ठिकाणचे प्रवासी प्रवास करीत होते. आपला जीव वाचल्याने प्रवाशांनी बसच्या खाली उतरून बसचालकाचे आभार मानले.एका महिन्यात दुसरी घटना४६ सप्टेंबर रोजी जिंतूर-रिसोड या बसला याच ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी ६२ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालक मधुकर घुगे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांंचे जीव वाचले होते. त्यातच आता १९ सप्टेंबर रोजी येलदरी येथील याच अरुंद पुलावरून वळण घेताना बसचे पाटे तुटल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.४बसचालक विजय पदमाने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ब्रेक लावून ५७ प्रवाशांचे जीव वाचविले. ही बाब एसटी महामंडळाने गांभीर्याने घेऊन दर्जेदार बस लांब पल्यासाठी वापराव्यात, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीBus Driverबसचालक