शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दाट धुक्यांत परभणीतील रस्ते झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:58 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून, बुधवारी पहाटे दाट धुके पडल्याने या धुक्यामध्ये रस्ते हरवल्याची स्थिती निर्माण झाली होती़ वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला असून, दिवसभर वातावरणाती गारवा कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून, बुधवारी पहाटे दाट धुके पडल्याने या धुक्यामध्ये रस्ते हरवल्याची स्थिती निर्माण झाली होती़ वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला असून, दिवसभर वातावरणाती गारवा कायम आहे़यावर्षी तब्बल एक महिना उशिने थंडीला सुरुवात झाली आहे़ किमान आणि कमाल तापमानामध्ये लक्षणीय घट होत असून, वातावरणात गारवा निर्माण होत आहे़ उत्तर भारतामध्ये हिमवृष्टी होत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर होत आहे़ राज्याच्या सिमावर्ती भागातून थंड वारे वाहत असून, या वाऱ्यामुळे थंडीचा परिणाम अधिक जाणवत आहे़ दोन दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे़ याच दरम्यान, बुधवारी पहाटे दाट धुके पसरले होते़ जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये धुक्याची चादर पसरल्याने पहाटे रस्ते धुक्यामध्ये गायब झाले होते़सकाळी ७ वाजेपर्यंत रस्त्यांवर धुके होते़ त्यामुळे या धुक्यातून वाट काढताना वाहनधारकांना चक्क हेडलाईट लावून वाहने चालवावी लागली़ मंगळवारी रात्री देखील मोठ्या प्रमाणात थंडी होती़ ठिक ठिकाणी शेकोट्या पेटवून आणि उबदार कपड्यांचा वापर करून थंडीपासून बचाव केला जात आहे़ वाढलेल्या थंडीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ सकाळची कामे उशिराने सुरू होत असून, सायंकाळी ७ वाजेनंतर रस्ते सुनसान पडत आहेत़ दिवसभर गारवा असल्याने गारवा जाणवत आहे़१० वर्षानंतर आले पांढरे दाट धुके४परभणी जिल्ह्यात १० वर्षानंतर पहिल्यांदाच पांढरे दाट धुके बुधवारी पहाटे पसरल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ के़ के़ डाखोरे यांनी सांगितले़४वातावरणात वारा नसल्याने धुक्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली़ दवबिंदूचे धुक्यात रुपांतर झाले़ त्यामुळे कमी अंतरावरील दिसण्याची क्षमता कमी जानवली़, असेही यावेळी डॉ़ डाखोरे यांनी सांगितले़ बुधवारी सकाळी ८़३० वाजेपर्यंत शहर व परिसरात धुके दिसून आले़किमान तापमान ९़६ अंशावरजिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली असून, बुधवारी जिल्ह्याचे किमान तापमान ९़६ अंश एवढे निच्चांकी नोंद झाले आहे़ विशेष म्हणजे कमाल तापमानही २५ अंशापर्यंत पोहचले आहे़ यावर्षीच्या हिवाळ्यात १५ दिवसांपूर्वी पारा ९ अंशापर्यंत उतरला होता़ त्यानंतर बुधवारी पुन्हा तापमानात लक्षणीय घट झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीweatherहवामान