शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

परभणी पंचायत समिती :घरकुल योजनेला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:15 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व ज्या नागरिकाकडे कच्चे बांधकाम असलेले घर आहे, त्या नागरिकाला केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानातून पक्के घर मिळावे, यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजनेला अंमलात आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला व प्रत्येक पंचायत समितींना प्रत्येकी एका वर्षाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार परभणी पंचायत समितीला २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४०५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार पंचायत परभणी समितीकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार परभणी तालुक्यातील ६३३ लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यापैकी ५६३ लाभार्थ्यांची परभणी पंचायत समिती प्रशासनाकडून जिओ टॅगिंग करण्यात आली. त्यातून ४०५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रति एका घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान चार हप्त्यात दिले जाते.३९५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्प्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली. दुसऱ्या हप्त्यातील रक्कम ३९५ पैकी ३४० लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली. त्यामुळे या लाभार्थ्यांची हक्काची घरे वेळेत पूर्ण होतील, अशी लाभार्थ्यांसह वरिष्ठ अधिकाºयांना अपेक्षा होती. २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपून २०१७-१८ या वर्षातीलही पाच महिने पूर्णत्वास आले आहेत. मात्र परभणी पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलेले घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परभणी तालुक्यात या योजनेला मरगळ आल्याचेच दिसून येत आहे.गतवर्षीचे जिल्ह्याचे उद्दिष्टही अर्ध्यावरप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २ हजार ६७१ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ १ हजार ८०६ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याला या योजनेअंतर्गत दिलेले उद्दिष्टही अर्ध्यावरच दिसून येते. यामध्ये गंगाखेड तालुक्याला ३४० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २३० घरकुले पूर्णत्वास गेले आहेत. जिंतूर तालुका ५६१ पैकी ३५९, मानवत १४६ पैकी १११, पालम ३५८ पैकी २५८, परभणी ४०५ पैकी २५४, पाथरी २२४ पैकी १८२, पूर्णा २४१ पैकी १४०, सेलू २१३ पैकी १६७, सोनपेठ १८३ पैकी १०५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा अडथळाप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची कामे करताना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली आहे. परभणी पंचायत समिती प्रशासनामार्फत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारुन छाननी, मंजूर व प्रशासकीय मान्यता देणे आदी कामे केली जातात. मात्र घरकुलांचे जिओ टॅगिंग करण्यासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी कंपनीने गृहनिर्माण अभियंता या पदाचे कंत्राटी पद्धतीने दोन पदे भरली आहेत. या अभियंत्यांनी जिओ टॅगिंग करुन पं.स. प्रशासनाला अहवाल सादर करावयाचा असतो. त्यानंतर लाभार्थ्याला घरकुलाची रक्कम अदा केली जाते. मात्र घरकुल लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन व घरकुलांचे अंतिमीकरण याची प्रगती परभणी तालुक्यात असमाधानकारक आहे.यावरुन परभणी पंचायत समितीच्या वतीने तीन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस १७ एप्रिल रोजी पाठविण्यात आली आहे. मात्र अजूनही या अभियंत्याचे काम समाधानकारक झाले नाही. त्यामुळे या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदाचाच या योजनेला अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर वचक ठेवून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरpanchayat samitiपंचायत समिती