शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: पोहंडुळ ग्रा.पं. कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:56 IST

तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.पोहंडूळ येथील उपसरपंच माधव नाणेकर यांनी मागील तीन वर्षात ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत अनेक वेळा गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडे तक्रारी केल्या; परंतु, सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समिती प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. या संदर्भात १४ आॅगस्ट २०१८ रोजी गटविकास अधिकाऱ्यांना उपोषणाचा इशारा दिल्यानंतर २८ आॅगस्ट रोजी चौकशी समिती नेमून कारभाराची चौकशी केली. मात्र चौकशीचा अहवाल दिला नाही. या अहवालासाठी उपसरपंच नाणेकर यांनी पुन्हा १९ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीकडे अर्ज केला होता. त्याचबरोबर १६ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडेही अर्ज सादर केला होता. यावेळी शौचालय संदर्भात काही ग्रामस्थांची यादी देखील दिली होती. तरी देखील प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून उपसरपंच नाणेकर यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन